शिरुरजवळ रुग्णवाहिकेला अपघात; 3 ठार

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 26 जानेवारी 2017

चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. न्हावरे गावातील एक मुलगा आजारी असल्याने त्याला उपचारासाठी शिरुर येथे नेत असताना हा अपघात झाला.

शिरूर - पुणे जिल्ह्यातील शिरुर तालुक्यातील नाव्हरे या गावाजवळ रुग्णवाहिका झाडावर आदळून झालेल्या भीषण अपघातात तीन जण ठार झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी रात्री साडेदहाच्या सुमारास हा अपघात झाला. नाव्हरे येथील एका रुग्णवाहिकेला हॉटेल नानाश्रीजवळ अपघात झाला. रुग्णवाहिका एका झाडावर जाऊन जोरात आदळली. या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला, तर अन्य एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. रुग्णवाहिकेची धडक एवढी जोरात होती, की झाड मोडून रुग्णवाहिकेत घुसले. 

चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. न्हावरे गावातील एक मुलगा आजारी असल्याने त्याला उपचारासाठी शिरुर येथे नेत असताना हा अपघात झाला. पोलिस अधिक तपास करत आहेत. मृत्युमुखी पडलेल्यांची नावे समजू शकली नाहीत.

Web Title: ambulance accident near shirur