महेश मांजरेकरांकडून रुग्णवाहिका

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 22 मे 2018

सोमाटणे - अपघातग्रस्तांना तातडीच्या मदतीसाठी दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्याकडून येथील राणी अँब्युलन्सला दोन अद्ययावत रुग्णवाहिका भेट देण्यात आल्या. 

१६ एप्रिल २०१६ रोजी दिग्दर्शक महेश मांजरेकर यांचा पुतण्या अक्षय मांजरेकर यांच्या गाडीला चाकणकडे जात असताना तळेगाव पुलावर अपघात झाला. त्यात अक्षय बेशुद्धावस्थेत मोटारीत अडकला होता. त्या वेळी स्थानिकांनी शंभर क्रमांकावर संपर्क साधला. परंतु रुग्णवाहिका मिळाली नाही. 

ही घटना समजताच सोमाटणे येथील राणी अँब्युलन्सचे अजय मुऱ्हे घटनास्थळी आले. त्यांनी तातडीने अक्षय यांना पवना हॉस्पिटलमध्ये दाखल केले. तेथे तीन महिन्यांच्या उपचारांनंतर त्यांची प्रकृती बरी झाली. या घटनेनंतर महेश मांजरेकर यांनी या संस्थेस दोन अत्याधुनिक रुग्णवाहिका भेट दिल्या.

Web Title: ambulance by mahesh manjarekar