रुग्णवाहिकांचे सायरन पुन्हा वाजू लागल्याने नागरिकांच्या हृदयाचे ठोके वाढले

Ambulance
Ambulance

पिंपरी - कोरोना कमी झाला किंवा गेला, असे मागील आठवड्यापर्यंतचे चित्र होते. त्यामुळे सर्व जनजीवन पूर्वपदावर येऊन गजबज झाली. मात्र, काही दिवसांपासून रुग्ण वाढू लागल्याने वातावरण चिंतातूर बनले आहे. त्यातच रुग्णवाहिकांचे सायरन पुन्हा वाजू लागल्याने नागरिकांच्या हृदयाचे ठोके वाढले आहेत. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

कित्येक दिवस चौकाचौकांमध्ये शांतता होती. सध्या दिवसभरात सात ते आठ रुग्णवाहिका जाता-येता नजरेस पडत आहेत. शहरात सध्या खासगी ९० आणि महापालिकेच्या आठ रुग्णवाहिका आहेत. रुग्णवाहिका रस्त्यावरून जात असताना कोरोनाची तीव्रता लक्षात येत आहे. सायरन हे कोरोना रुग्णासाठी व अति जोखमीच्या रुग्णासाठीच लावले जातात. याचा आवाज ७५ ते ११०-१२० डेसिबल असतो. रुग्णाला तातडीने वैद्यकीय मदत मिळावी, यासाठी रस्ता मोकळा करून द्या, अशी सूचना त्यामागे असते. 

कोरोना रुग्णांची संख्या दररोज दोनशेहून अधिक होत आहे, तर सक्रिय रुग्ण तीन हजारांवर आहेत. पॉझिटिव्ह रुग्णांचाही यामध्ये समावेश आहे. सध्या ज्या भागात रुग्ण सापडेल, त्या ठिकाणांहून रुग्णालय व कोविड सेंटरमध्ये रुग्ण नेले जात आहेत. यामध्ये अतितातडीच्या सेवेत १०८ नंबरचा देखील समावेश आहे. रुग्णवाहिका सेवा सक्षम असल्यास रुग्णांचा जीव वाचेल, या आशेनेच नागरिक या सेवेकडे धाव घेत आहेत. कोरोना काळात व सध्याही रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता नागरिक तत्परतेने रुग्णवाहिकेला वाट देऊन माणुसकीचे दर्शन घडवीत आहेत.

प्रत्येक कोरोना सेंटरच्या ठिकाणी सध्या एकच रुग्णवाहिका आहे. रुग्णसंख्या वाढल्यास मागणी वाढेल. सध्या जेमतेम कॉल आहेत. वायसीएममध्ये आहे, त्या रुग्णवाहिकेवर काम सुरू आहे. 
- मनोज साकोरे, रुग्णवाहिकाचालक

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com