अमेरिकेतील विद्यार्थीनी देणार मंगळ मोहिमेची माहिती

राजकुमार थोरात
सोमवार, 7 मे 2018

वालचंदनगर : वालचंदनगर (ता.इंदापूर) येथील भारत चिल्ड्रेन्स अॅकॅडमी स्कुलमधील विद्यार्थ्यांना अमेरिकेतील मिशिगन विद्यापीठातील विद्यार्थीनी मंगळावरील मोहिम व वातावरणाची माहिती विविध प्रयोगातुन देणार आहेत. 

वालचंदनगर : वालचंदनगर (ता.इंदापूर) येथील भारत चिल्ड्रेन्स अॅकॅडमी स्कुलमधील विद्यार्थ्यांना अमेरिकेतील मिशिगन विद्यापीठातील विद्यार्थीनी मंगळावरील मोहिम व वातावरणाची माहिती विविध प्रयोगातुन देणार आहेत. 

येथील शाळेमध्ये अमेरिकेतील मिशिगन विद्यापीठीतील अॅगा, सिमरन बटर, अॅलीसा ब्लंट, आरथी नदाल, रहैदा या विद्यार्थ्यांनी आल्या आहेत. 7 ते 11 मे या कालावधीमध्ये त्या शाळेतील विद्यार्थ्यांना मंगळ ग्रहावरील वातावरणाचे धडे देणार असून मंगळवरती कसे जीवनमान असेल, जाण्यासाठी कशा प्रकारच्या रॉकेटची गरज आहे, संगणप्रणालीचा कसा उपयोग करत येईल, मंगळावरती बलून कार कशी असेल, सोलर ओव्हनचा कसा वापर करावा लागेल याचे धडे देण्यात येणार अाहेत.  

शाळेच्या वतीने सर्व परदेशी विद्यार्थीनींचे गुलाबपुष्प देवून स्वागत करण्यात आले. यावेळी शाळा समितीचे उपाध्यक्ष पांडुरंग कवडे, वालचंदनगर कंपनीच्या भारती पटेल,शाळेचे प्राचार्य कृष्णदेव क्षीरसागर,पर्यवेक्षक गौरीशंकर हत्तीकाळ, प्रेमा सिंग, अमोल गोडसे, प्रचना माळशिकारे,रवींद्र वेदपाठक उपस्थित होते. वालचंदनगर कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी जी.के.पिल्लई व शाळा समितीचे अध्यक्ष धीरज केसकर यांच्या संकल्पनेतुन विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासासाठी हे शिबिराचे आयोजन केले असल्याचे माहिती क्षीरसागर यांनी दिली.  

Web Title: american students give information about mars campaign