आम्हाला नि:स्वार्थी सेवेचा संदेश जगभर पोचवायचा आहे :  डॉ. अमित कामले  

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 12 ऑक्टोबर 2019

या उपक्रमाचे नाव ग्लोरिफाय ख्राईस्ट असे असून  या उपक्रमाची संकल्पना डॉ. अमित कामले यांना सुचली. तेव्हापासून संगीत क्षेत्रांतील शान,जावेद अली, साधना सरगम, मधुश्री, बेला शेंडे यांसारखे नामवंत गायक 'ग्लोरिफाय ख्राईस्ट" शी जोडले गेले आहेत. 

पुणे : २०१२ मध्ये सुरूवात करून इस्त्राएल, जॉर्डन आणि इजिप्त येथे,ख्रिश्चनांच्या पवित्र भूमीस भेट देण्याच्या सहली आयोजित करण्याची खासियत असणाऱ्या ए.के इंटरनॅशनल टूरिझमने २०१६ पासून गॉस्पेल संगीत विभागांत पदार्पण केले आहे.

या उपक्रमाचे नाव ग्लोरिफाय ख्राईस्ट असे असून  या उपक्रमाची संकल्पना डॉ. अमित कामले यांना सुचली. तेव्हापासून संगीत क्षेत्रांतील शान,जावेद अली, साधना सरगम, मधुश्री, बेला शेंडे यांसारखे नामवंत गायक 'ग्लोरिफाय ख्राईस्ट" शी जोडले गेले आहेत. या वर्षी निर्मात्यांनी, ‘आराधना’, हे  भक्तीगीत ८ ऑक्टोबरला, डॉ. अमित कामले यांच्या वाढदिवसाला प्रसिध्द करायचे असे ठरवले आहे.

आराधना म्हणजे पूजा !.
रविराज यांनी हिंदीमध्ये गीतरचना केलेले हे गाणे अन्वेषा यांनी अतिशय सुरेख रित्या गायले आहे.निर्मात्यांनी हे गाणे संडे स्कूल मधील शिक्षकांना अर्पण केले असून या गाण्याच्या चित्रिकरणांत अभिनेत्री त्रिधा चौधरी ही प्रमुख भूमिकेत दिसते.
डॉ. अमित कामले यांनी म्हटले, “ आमच्या गाण्यातून आम्हाला नि:स्वार्थी सेवेचा संदेश जगभर पोचवायचा आहे."

पोर्णिमा कामले म्हणतात, “सर्व गॉस्पेल संगीत चाहत्यांच्या हृदयांत, हे गीत अढळ स्थान निर्माण करेल असे मला वाटते. अद्विता ही सुध्दा या गाण्यात सहभागी असल्याने मला अतिशय आनंद होत आहे.”  

Image may contain: 2 people, people smiling, people standing

त्रिधानेही अपल्या भावना व्यक्त केल्या आणि म्हटले,  “या गाण्याचे शूटिंग करताना मला खूप मजा आली आणि फार छान वाटले. मला खात्री आहे की लोकांना हे गाणे निश्चित आवडेल कारण त्यातून जगभरच्या लोकांसाठी महत्वाचा संदेश दिला आहे.”
अन्वेशाने बंगालीमध्ये "आराधोना" आणि मल्याळममध्ये "आराध्याचिडुवेन" सुंदर गायले आहे. राष्ट्रीय पुरस्कार विजेते शाशा तिरुपती यांनी तामिळमध्ये "आराधनाई", तेलगूमध्ये "आराधिस्तम" आणि तराली सर्मा यांनी आसामी मध्ये "आराधोना कोरु" गायली आहे. केका घोषालने आपला आवाज खासी आवृत्ती "माने इया यू त्रे" आणि नागामी आवृत्ती "नाम उचा कोरी असे" यांना दिला. इस्त्रायली गायिका सोफिया सोलोमन यांनी "याचनाद निसा तेफिलाह" हिब्रू भाषेत, इस्राएल राष्ट्राची अधिकृत भाषा केली.

 

Image may contain: 2 people, people smiling, people standing

आराधना हे ग्लोरिफाय ख्राईस्ट ४ अल्बममधील गीत आज प्रसिध्द होत आहे आणि ए. के . इंटरनॅशनल टूरिझमच्या यू ट्युब चॅनेल www.youtube.com/akinternationaltourism वर तुम्ही ते पाहू शकता.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Amit Kamle enters in music industry