video : घे भरारी! लॉकडाऊनमुळे व्यवसाय बंद झाला; फूड बिझनेसनं दिला आधार

शरयू काकडे
Tuesday, 19 January 2021

'घे भरारी' हा नवउद्योजकांसाठी तयार केलेला फेसबुक गृप. या गृपवर जवळपास 60 हजार नव- उद्योजक आहेत. बावधनमधील सूर्यदत्ता इन्स्टिट्यूट शेजारील पालिकेच्या मैदानात नुकतेच हे प्रदर्शन भरले होते.

पुणे : कोरोनामुळे लागू केलेल्या लॉकडाऊनच्या काळात कित्येकांच्या नोकऱ्या, व्यवसाय बंद पडले. या परिस्थितीमुळे खचून न जाता पुन्हा उभारी घेत कित्येकजणांनी उद्योगाकडे वळले. अशीच काहीशी स्थिती अमित कुलकर्णी आणि आस्मी कुलकर्णी यांच्याबाबती झाली. लॉकडाऊनपुर्वी त्यांचा ट्रॅव्हल आणि टूरिझमचा व्यवसाय असलेला व्यवसाय अचानक बंद पडला. खचून न जाता त्यांना दोघांनी मिळून फुड बिझनेसध्ये उतरण्याचे धाडस केले. मराठवाड्यातील खाद्यसंस्कृती पुण्यात घेऊन येण्याचा प्रयत्न या दाम्पत्याने केला आहे. 

'घे भरारी' हा नवउद्योजकांसाठी तयार केलेला फेसबुक गृप. या गृपवर जवळपास 60 हजार नव- उद्योजक आहेत. बावधनमधील सूर्यदत्ता इन्स्टिट्यूट शेजारील पालिकेच्या मैदानात नुकतेच हे प्रदर्शन भरले होते. या प्रदर्शनात जवळपास शंभर-एक नवउद्योजकांचे स्टॉल्स होते. यामध्ये वेगवेगळै खाद्यपदार्थ, कपडे, ड्रेस मटेरिल्स, क्रिएटिव्ह वस्तू आणि इतर आनेक वस्तू तसेच पदार्थांचे स्टॉल्स आहेत. या प्रदर्शनात सहभागी झालेले गेड फुड सर्व्हिसेसचे अमित कुलकर्णी आणि आस्मी कुलकर्णी यांनी देखील सहभाग घेतला होता. मराठवाड्यातील खाद्यसंस्कृती दर्शविणारा उदगीरचा सुशीला, लोणी धपाटे, थालिपीठ, उस्मानाबादचा काला जामून, जिलेबी, गुजराती फाफडा असे चविष्ठ पदार्थ येथे उपलब्ध होते. खवय्या पुणेकरांनाही मराठवाड्यातील खाद्य पदार्थांवर ताव मारत आस्वाद लुटला. मराठवड्यातून येऊन पुण्यात स्थायिक झालेल्या आणि पुणेकरांना मराठवाड्यातील खाद्यासंस्कृतीचा आस्वाद घेता यावा या उद्देशाने त्यांनी हा व्यवसाय सुरु केला.  

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

लॉकडाऊन होण्यापुर्वी अमित कुलकर्णी यांचा ट्रॅव्हल आणि टूरिझमचा व्यवसाय होता. कोरोना काळात व्यवसायाला फटका बसल्यानंतर त्यांनी फुड बिझनेसमध्ये उतरण्याचे ठरविले. सुरवातीला त्यांनी घरगुती पिठे, खाद्यपदार्थ विक्रीचा व्यवसाय सुरू केला त्याला कोरोना काळातच चांगला प्रतिसाद मिळू लागला. त्यानंतर त्यांची पत्नी आस्मी यांच्या साथीने अमित कुलकर्णी यांनी थोडे धाडस करत मराठवाड्यातील खाद्यपदार्थाचा व्यवसाय सुरु केला. त्यालाही ग्राहकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. अचानक झालेल्या लॉकडाऊनमुळे कित्येकांच्या व्यवसायाल फटका बसला आहे. पण खचून न जाता जिद्दीने उभे राहून पुन्हा नव्याने उभे राहिले. त्यांच्या या प्रयत्नांची प्रेरना अनेक नवउद्योजकांना मिळत आहे. 

 

Video : अशक्य काही नसतं हो; दिव्यांग तरुणाने तयार केला स्वत:चा ब्रँड


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Amit kulkarni started food business after tourism business shut down in lockdown