गुजरातमध्ये मोदींनी 'जाणता राजा' नाटक ठेवलं अन्..; पुरंदरेंची आठवण काढत काय म्हणाले अमित शाह? Amit Shah | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Amit Shah Visit Pune

भाषणाच्या सुरुवातीला त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) आणि बाबासाहेब पुरंदरे यांना अभिवादन करुन भाषणाला सुरुवात केली.

Amit Shah : गुजरातमध्ये मोदींनी 'जाणता राजा' नाटक ठेवलं अन्..; पुरंदरेंची आठवण काढत काय म्हणाले अमित शाह?

Amit Shah Visit Pune : गृहमंत्री अमित शाह कालपासून पुणे दौऱ्यावर आले आहेत. त्यामुळं पुण्यात कसबा-चिंचवड पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांचा हा दौरा महत्वाचा मानला जात आहे.

काल अमित शाहांनी 'मोदी ॲट ट्वेन्टी' या पुस्तकाचं प्रकाशन केलं, तर आज शाह बाबासाहेब पुरंदरे (Babasaheb Purandare) यांच्या संकल्पनेतून उभारण्यात आलेल्या शिवसृष्टीत आयोजित कार्यक्रमात सहभागी झाले आहेत. या कार्यक्रमात बोलताना त्यांनी बाबासाहेब पुरंदरे यांचं तोंडभरुन कौतुक केलं.

भाषणाच्या सुरुवातीला त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) आणि बाबासाहेब पुरंदरे यांना अभिवादन करुन भाषणाला सुरुवात केली. शाह म्हणाले, 'गुजरातमध्ये नरेंद्र मोदींनी जाणता राजा नाटकाचे 8 जिल्ह्यात प्रयोग दाखवले, त्यावेळी गुजरातचे लोक नाटक बघायला यायचे आणि शिवाजी महाराजांचे भक्त होऊन जायचे.'

छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र आजही काश्मीर ते कन्याकुमारी आणि द्वारका ते कलकत्तामधील लोकांना प्रेरित करत आहे. शिवसृष्टीचा पहिला टप्पा मी पाहून आलोय. 60 करोडोंचा खर्च यासाठी आलाय. याठिकाणी येणारा प्रत्येक माणूस शिवरायांबद्दल सर्व काही माहिती घेऊन जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

शिवसृष्टीत वैभवशाली इतिहासाबरोबरच अत्याधुनिक थ्रीडी तंत्राचाही वापर करण्यात आला आहे. शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याचं साम्राज्य उभं केलं, पुढं हाच भगवा पेशव्यांनी अटकेपार नेला. शिवाजी महाराजांनी देऊन स्वराज्याची मुहूर्त मेढ रोवलीये, असं शाह म्हणाले. यावेळी त्यांनी पाकिस्तानवरही टीका केली.

त्याकाळात शिवरायांनी शिवकालीन मंदिरं मुघल साम्राज्यापासून वाचवली आणि नव्यानं उभीही केली. तेच कार्य आमचं सरकार करतंय राम मंदिर उभारून. शिवाजी महाराज हे रणांगणात नेहमीच समोरून शत्रूचा सामना करायचे. आग्राहून सुटका हा त्यांचा गनिमी काव्याचा डाव चकित करून सोडतो. शिवाजी महाराजांनी त्याकाळीच ग्रामीण अर्थ व्यवस्था उभी केली होती, असं शाहांनी सांगितलं.