#saathchal अमित शहा घेणार आज पालख्यांचे दर्शन 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 8 जुलै 2018

पुणे : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा हे रविवारी (ता. 8) श्री संत ज्ञानेश्‍वर महाराज आणि श्री संत तुकाराम महाराज पालखीचे दर्शन घेणार आहेत. पालखी मुक्कामाच्या ठिकाणी जाऊन शहा दुपारी बाराच्या सुमारास दर्शन घेतील, असे पक्षाच्या स्थानिक नेत्यांनी सांगितले. 

दरम्यान, शहा यांचे "आर्य चाणक्‍य' या विषयावर गणेश कला क्रीडामंच येथे सायंकाळी साडेपाच वाजता व्याख्यान होणार आहे. हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे. रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीतर्फे आयोजित कार्यक्रमासाठी शहा रविवारी पुण्यात येणार आहेत. त्यात व्याख्यानसह बालगंधर्व रंगमदिरात दुपारी एक वाजता होणाऱ्या "सोशल मीडिया' संदर्भातील मेळाव्याला ते उपस्थित राहणार आहेत. त्याआधी भवानी पेठ आणि नाना पेठेत जाऊन दोन्ही पालख्यांचे दर्शन घेतील. 

Web Title: Amit Shah will visit palakhi today