शेवटच्या श्वासापर्यंत साहेबांसोबतच', अमोल कोल्हेंसह कार्यकर्त्यांनी घेतली शपथ

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 1 ऑगस्ट 2019

मेगा ओहोटी सुरु असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना आज शेवटच्या श्वासापर्यंत पक्षाध्यक्ष शरद पवार यांची साथ सोडणार नाही, अशी शपथ दिली गेली. पुण्यात आयोजित केलेल्या राष्ट्रवादी युवा संवाद कार्यक्रमात पार्थ पवार यांच्या उपस्थितीत ही शपथ दिली गेली.

पुणे : मेगा ओहोटी सुरु असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना आज शेवटच्या श्वासापर्यंत पक्षाध्यक्ष शरद पवार यांची साथ सोडणार नाही, अशी शपथ दिली गेली. पुण्यात आयोजित केलेल्या राष्ट्रवादी युवा संवाद कार्यक्रमात पार्थ पवार यांच्या उपस्थितीत ही शपथ दिली गेली.

काय दिली गेली शपथ?
'मी आज शपथ घेतो, की मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा क्रियाशील कार्यकर्ता आहे. आदरणीय श्री. शरदराव पवार यांनी स्वाभिमानातून स्थापन केलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विचारांशी माझी बांधिलकी आहे.

गेली 55 वर्षे राजकारणात आपला ज्यांनी वेगळा ठसा निर्माण केला. अशा पवारसाहेबांच्या कठीण काळात त्यांना साथ देणे, हे माझे प्रथम कर्तव्य आहे आणि त्यासाठी पडेल ते कष्ट घेण्यास मी सदैव तत्पर राहीन. माझ्या शरीरात जोपर्यंत श्वास आहे, तोपर्यंत मी पवार साहेबांची साथ सोडणार नाही. जयहिंद! जय महाराष्ट्र ! जय राष्ट्रवादी !


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: amol kolhe and ncp Party workers take oath in pune