इंदापूर तालुक्यातील दहा तीर्थक्षेत्रांच्या विकासासाठी 1 कोटी 17 लाख रुपयांचा निधी

राजकुमार थोरात
शुक्रवार, 30 मार्च 2018

इंदापूर तालुक्याचे आमदार दत्तात्रेय भरणे यांनी तालुक्याचा सर्वांगिण विकास करण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरु केला आहे. विरोधी पक्षाचा आमदार असताना देखील तालुक्यामध्ये रस्त्याच्या कामासाठी कोट्यावधी रुपयांचा निधी आणला आहे.

वालचंदनगर - जिल्हा नियोजन मंडळाच्या माध्यमातून इंदापूर तालुक्यातील दहा तीर्थक्षेत्रांच्या विकासकामांसाठी 1 कोटी 17 लाख रुपयांचा निधी मंजूर केल्याची माहिती आमदार दत्तात्रय भरणे यांनी दिली.  
 
इंदापूर तालुक्याचे आमदार दत्तात्रेय भरणे यांनी तालुक्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरु केला आहे. विरोधी पक्षाचा आमदार असताना देखील तालुक्यामध्ये रस्त्याच्या कामासाठी कोट्यावधी रुपयांचा निधी आणला आहे. नीरा नरसिंहपूर येथील तीर्थक्षेत्राच्या विकासापाठोपाठ तालुक्यातील
10 तीर्थक्षेत्रांच्या विकासासाठी राज्यशासनाच्या ग्रामविकास व जलसंधारण विभागाच्या माध्यमातून 1 कोटी 17 लाख रुपयांचा निधी आहे. यामध्ये रुई येथील बाबीरबुवा देवस्थान येथे प्लेविंग ब्लॉक बसवणे (15 लाख),निरवांगी येथील नंदिकेश्वर देवस्थान येथे प्लेविंग ब्लॉक बसवणे (8 लाख), निमगाव केतकी येथील सावतामाळी मंदिर परिसरात भक्त निवास बांधणे (20 लाख), शेळगाव येथील मुक्ताबाई मंदिर येथे भक्तनिवास बांधणे (15 लाख), सणसर येथील श्रीक्षेत्रास रस्ता बनवणे (8 लाख), भांडगाव येथील म्हसोबा देवस्थानास प्लेविंग ब्लॉक बसवणे (8 लाख), लुमेवाडी येथील जोधपुरी बाबा दर्गा येथे प्लेविंग ब्लॉक बसवणे (8 लाख), वरकुटे खुर्द येथील श्रीराम मंदिर येथे प्लेविंग ब्लॉक बसवणे (15 लाख), भरणेवाडी येथील बिरोबा देवस्थान येथे प्लेविंग ब्लॉक बसवणे (5 लाख) व भक्त निवास बांधण्यासाठी 15 लाखांचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती आमदार भरणे यांनी दिली आहे. 

Web Title: An amount of Rs 1.17 crore has been provided for development of ten holy places