फवारणी औषंधाच्या विषबाधेमुळे मजूर युवकाचा मुत्यू

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 8 सप्टेंबर 2017

दोन्ही युवकांना उलट्या झाल्याने रात्री उशीरा कुटुंबीयांनी उपचारासाठी दर्यापूरातील उपजिल्हा रुगणालयात दाखल केले होते.

दर्यापूर (जिल्हा अमरावती) : तालुक्यातील म्हैसपूर पाथरवीरा येथील एका शेतात गावातीलच दोन युवक पराटीवर फवारणीचे औषध फवारणी करण्याकरीता सोमवारी गेले होते. दरम्यान घरी आल्यावर दोन्ही युवकांना उलट्या झाल्याने रात्री उशीरा कुटुंबीयांनी उपचारासाठी दर्यापूरातील उपजिल्हा रुगणालयात दाखल केले होते.

घटनेतील किरण प्रेमदास ठाकरे (१९) याला पुढील उपचारासाठी अमरावती येथे हलविण्यात आले होते. मात्र जिल्हा सामान्य रुगणालयात उपचार दरम्यान गुरवार (दि. ७) किरण ठाकरे या युवकाचा मुत्यू झाला, तर रामा नरहरी ठाकरे (३०) यांच्यावर दर्यापुरातील खाजगी हाँस्पीटलमध्ये उपचार सुरू आहेत. प्रकृतीत सुधारणा असल्याचे समजते. मृत किरण याच्या मागे आई-वडील, बहीण असा परिवार असून, गुरुवारी रात्री उशीरा मृतक किरण ठाकरे याच्यावर म्हैसपूर गावातच शोकाकूल वातावरणात अत्यसंस्कार करण्यात आले.

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या : 
सदाभाऊ यांचा अखेर 'सवतासुभा'
इनक्‍युबेटरचा सरसकट वापर अनावश्‍यक
ओडिशात आघाडी करणार नाही: अमित शहा
फिरोज, ताहीर यांना फाशीची शिक्षा
श्रुती बडोले यांनी शिष्यवृत्ती अर्ज घेतला मागे
उच्चशिक्षण क्षेत्रासमोरच्या आव्हानांवर चिंतन
बैलांच्या शर्यतींबाबतचा मसुदा अंतिम टप्प्यात
तरंगत्या सौर पॅनेलद्वारे 'उजनी'वर ऊर्जानिर्मिती शक्‍य
हिंसाचाराला "डेरा'चे आर्थिक पाठबळ
कोमलला मिळाले मदतीचे ‘हृदय’

Web Title: amravati news drugs poisoning death