esakal | अमरावतीची संत्री दुबईला रवाना 
sakal

बोलून बातमी शोधा

अमरावतीची संत्री दुबईला रवाना 

महाराष्ट्रातून द्राक्ष आणि आंबा या दोन फळांची निर्यात होते. परंतु त्यापलीकडे जाऊन यंदा संत्री उत्पादकांनी दुबईला संत्री निर्यात केली आहे. 

अमरावतीची संत्री दुबईला रवाना 

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पुणे - अमरावती जिल्ह्यातील संत्री कृषी पणन मंडळ आणि अपेडा यांच्या माध्यमातून दुबईला निर्यात करण्यात आली. गुरुवारी (ता. 13) एकूण 15 टन संत्रा निर्यात करण्यात आली. महाराष्ट्रातून द्राक्ष आणि आंबा या दोन फळांची निर्यात होते. परंतु त्यापलीकडे जाऊन यंदा संत्री उत्पादकांनी दुबईला संत्री निर्यात केली आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

संत्री निर्यातीचा कंटेनर रवाना करतेवेळी अपेडाचे सहा. सरव्यवस्थापक प्रशांत वाघमारे, कृषी पणन मंडळाचे उपसरव्यवस्थापक डॉ. भास्कर पाटील, हॉर्टिकलचर डेव्हलपमेंट ऑफिसर अभिमन्यू माने, तसेच कृषी व्यवसाय पणनतज्ज्ञ जंगम तुषार, नितीन मोरे, संजय गुरव, दुबई येथील आयातदार अलताफ हुसेन, रियास, तसेच निर्यातदार सोनल लोहारीकर आणि कृषी पणन मंडळाचे अधिकारी- कर्मचारी उपस्थित होते. 

कृषी पणन मंडळाच्या वाशी, नवी मंबई येथील पॅक हाउसमध्ये संत्र्याची प्रथम प्रतवारी करून संत्री पाण्याने स्वच्छ करून त्यावर वॅक्‍सिंग प्रक्रिया केली. त्यानंतरच दुबई येथे एस.डी.एफ. प्रॉडक्‍शन प्रा. लि. कंपनीमार्फत निर्यात करण्यात आली. या वेळी संत्रा बॉक्‍स पॅकिंग न करता प्रथमच 10 किलोच्या क्रेट्‌समध्ये टाकून रेफर कंटेनरने निर्यात केला आहे. हा कंटेनर 19 फेब्रुवारीला दुबई येथे पोहोचून विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे. 

राज्यामध्ये अमरावती आणि नागपूर जिल्ह्यात संत्र्याचे मोठे उत्पादन घेतले जाते. यंदा पणन मंडळाने संत्र्याच्या निर्यातीमधील अडचणी लक्षात घेतल्या. त्यानुसार संत्रा वॅक्‍सिंग करून निर्यात होण्यासाठी प्रयत्न सुरू केले. त्याचाच एक भाग म्हणून राज्यातून संत्रा प्रथमच वॅक्‍सिंग करून निर्यात करण्यात आली. 

यंदा 40 कंटेनर निर्यातीचे नियोजन 
संत्रा निर्यातीची संपूर्ण प्रक्रिया कृषी पणन मंडळ आणि अपेडा यांच्या तांत्रिक मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे. ही निर्यात यशस्वी झाल्यास या हंगामात सुमारे 40 कंटेनर निर्यातीचे नियोजन निर्यातदार आणि कृषी पणन मंडळाच्या वतीने करण्यात येत आहे.

loading image