अमृतांजन पूल धोकादायक

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 15 जून 2018

लोणावळा - खंडाळा घाटातील अमृतांजन पूल पर्यटकांचे आकर्षण ठरत आहे. मात्र पुलावर लोखंडी रेलिंग नसल्याने पर्यटकांसाठी धोकादायक ठरू शकते. दुर्घटना रोखण्यासाठी अमृतांजन पुलावर लोखंडी रेलिंग बसविण्याची मागणी करण्यात येत आहे. 

सुमारे पावणे दोनशे वर्षांपूर्वी बोरघाटामध्ये इंग्रजांनी अमृतांजन पुलाची उभारणी केली. हा पूल आजही मजबूत स्थितीत उभा आहे. द्रुतगती मार्गाची आखणी करताना जुन्या अमृतांजन पुलाशेजारी समांतर पुलाची उभारणी शासनाच्या वतीने करण्यात आली. या दोन्ही पुलांमध्ये अवघ्या काही फुटांचे अंतर आहे.

काही वर्षांपूर्वी एका पुलावरून दुसऱ्या पुलावर उत्साहात उड्या मारताना तरुणांना आपला जीव गमवावा लागला आहे. यावर खंडाळ्यातील रोहिदास मित्र मंडळाच्या वतीने पुढाकार घेत तात्पुरत्या स्वरूपात उपाययोजना करण्यात आली. त्यानंतर आयआरबी कंपनीच्या वतीने लोखंडी जाळीचे आच्छादन लावल्याने येथील दुर्घटनांना आळा बसला. मात्र जुन्या पुलाच्या उत्तरेकडील बाजूस असलेल्या लोखंडी खांबांवर रेलिंग नाही. मात्र रेल्वे आणि रस्ते विकास महामंडळ यांच्या मालकीच्या वादात हा पूल अडकल्याने या ठिकाणी उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत. सध्या अमृतांजन पुलावर पर्यटकांची गर्दी होत असून, या ठिकाणी फोटो काढण्याचा मोह पर्यटकांना आवरता येत नाही. उत्साहाच्या भरात एखादी दुर्घटना होण्याची शक्‍यता असल्याने दुर्घटना घडण्यापूर्वीच या ठिकाणी लोखंडी रेलिंग बसविण्यात यावे, अशी मागणी करण्यात येत आहे.

Web Title: amruntanjan bridge dangerous