अमृता फडणवीस म्हणतात, देवेंद्रजी मुख्यमंत्रीपदी असतील-नसतील फरक पडत नाही

Amruta Fadnavis
Amruta Fadnavis

पुणे : "देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असले तरीही मला सामान्य जीवन जगायला आवडते. त्यांचे व्यक्तिमत्त्व मला मनापासून आवडते. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असतील-नसतील मला काही फरक पडत नाही. ते माणूस म्हणून कसे आहेत ते महत्वाचं आहे. मोठ्या पदावर असलेल्या व्यक्तींविषयी अनेक प्रकारची मते व्यक्त केली जातात. मी त्यातील केवळ सकारात्मकता घेते,'' असे मत मुख्यमंत्र्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी व्यक्त केले. 

कर्तृत्ववान महिलांच्या यशोगाथा असणाऱ्या 'ग्रॅव्हिटस रत्न' या कॉफीटेबल बुकच्या प्रकाशनप्रसंगी फडणवीस बोलत होत्या. ग्रॅव्हिटस फाउंडेशनच्यावतीने या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. खासदार संजय काकडे, आमदार माधुरी मिसाळ, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, अभिनेता शाहरूख खान यांच्या पत्नी गौरी खान, ग्रॅव्हिटस फाउंडेशनच्या अध्यक्षा उषा काकडे, डॉ. परवेझ ग्रॅंट, क्रेडाई राष्ट्रीय अध्यक्ष सतीश मगर, रेखा मगर आदी उपस्थित होते.

अमृता फडणवीस म्हणाल्या, की मुख्यमंत्र्यांची पत्नी असणे याचे काही प्रमाणात फायदे आहेत तसेच तोटे देखील आहेत. टीकेचे जे रचनात्मक दगड मारले जातात ते महत्वाचे, जे नकारात्मक आहेत त्याकडे लक्ष न दिलेलं बरे.

मेघा शिंपी व पराग पोतदार यांनी या पुस्तकाचे संपादन केले आहे. या वेळी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांनी फडणवीस आणि खान यांची मुलाखत घेतली. खान म्हणाल्या, "इंटिरिअर डिझायनिंगमध्ये आनंद मिळतो. शाहरूख हा माझ्या पाठीशी उभा राहणारा पती आणि उत्तम पिता आहे.''

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com