अम्युझमेंट पार्क इंडस्ट्री वाचवा; राजीव जालनापूरकर यांचे पंतप्रधानांना साकडे

भारताचा विचार केल्यास राष्ट्रीय पातळीवर दरवर्षी सुमारे ३ कोटी पर्यटक हे अम्युझमेंट व थीम पार्क्सला भेटी देतात.
Rajeev Jalnapurkar
Rajeev JalnapurkarSakal

पुणे - भारताच्या सेवा क्षेत्रातील मनोरंजन उद्योगात (Entertainment Busienss) ४० टक्के योगदान असलेल्या अम्युझमेंट (Amusement) व थीम पार्क व्यवसायाला (Theme Park Business) कोरोनामुळे अर्थव्यवस्थेला (Economy) आलेल्या अनिश्चिततेच्या रोलर कोस्टर राईडमधून वाचवण्यासाठी मदतीचा (Help) हात द्या, अशी मागणी द इंडियन असोसिएशन ऑफ अम्युझमेंट पार्क्स अॅण्ड इंडस्ट्रीज अर्थात आयएएपीआय या संस्थेच्या वतीने करण्यात आली आहे. (Amusement Park Industry Save Rajiv Jalnapurkar Prime Minister)

पुणे शहराचे रहिवासी असलेले संस्थेचे अध्यक्ष राजीव जालनापूरकर यांनी नुकतेच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहित या व्यवसायाची सध्याच्या परिस्थिती, येणाऱ्या अडचणी यांची माहिती देत त्यांच्याकडून मदत मागितली आहे. याविषयी जालनापूरकर म्हणाले, ‘भारताचा विचार केल्यास राष्ट्रीय पातळीवर दरवर्षी सुमारे ३ कोटी पर्यटक हे अम्युझमेंट व थीम पार्क्सला भेटी देतात. याची एकूण वार्षिक उलाढाल ही १७ अब्ज रुपये (१७ बिलियन) व वार्षिक वाढीचा दर हा १७.५ टक्के इतका आहे. शिवाय किमान ७५ हजार नागरिकांना या उद्योगामधून थेट रोजगार उपलब्ध होतो तर अप्रत्यक्ष रित्या सुमारे अडीच लाख व्यक्तींना रोजगार मिळण्यास मदत होते.

Rajeev Jalnapurkar
पोलिसाने भावासह केली डॉक्‍टरची धुलाई; पुण्यातील धक्कादायक घटना

या आहेत अडचणी...

  • सध्या कर्मचाऱ्यांचे वेतन देणे, जीएसटी, अॅडव्हान्स टॅक्स, पीएफ, ईएसआय, राज्यांचे कर, व्याजाचे हप्ते भरणे अशक्य

  • आर्थिक संकटांसोबतच दिवाळखोरी, काही व्यवसाय कायमचे बंद

  • कामगारांना मोठ्या प्रमाणात नोकरीवरून काढून टाकणे

  • एका अंदाजानुसार या क्षेत्राला ९० हजार कोटींचा तोटा

या आहेत मागण्या...

  • सरकारने फिस्कल स्टॅट्युटरी कम्पायन्सची (वित्तीय वैधानिक अनुपालन) अंतिम मुदत वाढवावी

  • वित्तीय संस्थांकडून घेतलेल्या कर्जावरील व्याजदराच्या दरात जास्तीत जास्त घट करावी

  • पुढील १२ महिने जीएसटीमधून सूट द्यावी

  • वित्तीय संस्थांच्या देयकावर १२ महिन्यांची स्थगिती द्यावी

  • कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी वित्तीय साहाय्य करावे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com