आनंद ललवाणीचा जगभरात झेंडा

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 21 जून 2018

पुणे - पुण्याच्या आनंद ललवाणी या बावीस वर्षांच्या विद्यार्थ्याने भारताचा झेंडा अमेरिकेत रोवला आहे. अमेरिकेतील "नासा' या संस्थेने व्हर्जिनियातील वॅलॉप्स आइसलॅंड येथून "इक्विसॅट' या उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण केले. या उपग्रहाची निर्मिती अमेरिकेतील ब्राऊन विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी केली असून, या गटाचे नेतृत्व आनंद याने केले आहे.

भारतासाठी केलेल्या अभिमानास्पद कामगिरीची दखल घेऊन पत्रकार संघात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. वासुदेव गाडे यांच्या हस्ते आनंद ललवाणी यांचा सत्कार करण्यात आला. या वेळी अभय छाजेड, आनंदची आई संगीता ललवाणी, वडील विकास ललवाणी आदी उपस्थित होते. आनंदने ब्राऊन विद्यापीठातून इंजिनिअरिंग फिजिक्‍स या विषयात नुकतीच पदवी पूर्ण केली आहे.

आनंद म्हणाला, 'इक्विसॅट या प्रकल्पासाठी गेल्या सात वर्षांपासून काम सुरू आहे. यासाठी सतरा विद्यार्थ्यांच्या गटाचे नेतृत्व मी करत होतो. आमच्या गटाने मुख्यतः सौरऊर्जा आणि बॅटरी निर्मितीचे काम पाहिले. अत्युच्च क्षमतेच्या सौरऊर्जेवरील एलईडी दिव्यांचा अवकाशातील इतर उपग्रहांमध्ये जागा निश्‍चित करण्यासाठी या उपग्रहाला उपयोग होणार आहे.''

डॉ. गाडेकर म्हणाले, 'पुण्यातील विद्यार्थ्यांची आंतरराष्ट्रीय पातळीवरील झेप कौतुकास्पद आहे. तसेच, भारतातील होतकरू विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्याची आवश्‍यकता असून, भारताचे वेगळेपण जगासमोर येणे गरजेचे आहे.''

भविष्यात मला स्टॅनफोर्ड विद्यापीठातून सोलर एनर्जी या विषयात पीएचडीचे शिक्षण घ्यायचे असून, त्यानंतर माझ्या संशोधनाचा उपयोग भारताच्या विकासासाठी करायचा आहे. भारतात अनेक खेड्यांत अजूनही वीज पोचली नसल्याने सौरऊर्जा या विषयात काम करून भारतातील विजेचे संकट दूर करायचे आहे.
- आनंद ललवाणी

Web Title: anand lalwani Satellite america success