साहित्यिक आनंद यादव यांचे पुण्यात निधन

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 27 नोव्हेंबर 2016

पुणे - ज्येष्ठ लेखक, साहित्यिक, अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष आनंद यादव (वय 83) यांचे रविवारी रात्री वृद्धापकाळाने निधन झाले. पुण्यातील धनकवडी येथे राहत्या घरी अखेरचा श्‍वास घेतला. आनंद यादव यांना झोंबी या कादंबरीसाठी साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला होता. यादव यांच्या नटरंग कादंबरीवरून चित्रपटनिर्मिती झाली होती.

आनंद यादव यांची साहित्यसंपदा :
1960 नंतरची सामाजिक स्थिती आणि साहित्यातील नवे प्रवाह, साहित्याची निर्मिती प्रक्रिया, ग्रामीण साहित्य : स्वरूप व समस्या, ग्रामीणता : साहित्य आणि वास्तव, ग्राम संस्कृती, मराठी साहित्य : समाज आणि संस्कृती, मराठी लघुनिबंधाचा इतिहास, कलेचे कातडे, साहित्यिकाचा गाव, आदिताल, सैनिक हो, तुमच्यासाठी, शेवटची लढाई, आत्मचरित्र मीमांसा, झोंबी, नांगरणी, घरभिंती, काचवेल, गोतावळा, भय, माउली, नटरंग, भूमिकन्या, उखडलेली झाडं, झाडवाटा, स्पर्शकमळे, माळावरची मैना, पाणभवरे, डवरणी, खळाळ, मळ्याची माती, मातीखालची माती, माय-लेकरं, एकलकोंडा, घरजावई, उगवती मने, लोकसखा ज्ञानेश्‍वर, संतसूर्य तुकाराम.

Web Title: Anand Yadav passed away