अनंत चतुर्दशीला निर्माल्य संकलन मोहीम

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 10 सप्टेंबर 2019

सकाळ सोशल फाउंडेशन व पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेतर्फे आणि रोटरी क्‍लब ऑफ शनिवारवाडा यांच्या सहकार्याने अनंत चतुर्दशीच्या दिवशी गुरुवारी (ता. १२) पुण्यातील प्रमुख विसर्जन घाटांवर निर्माल्य संकलन मोहीम राबविण्यात येणार आहे. या उपक्रमास पुणे महापालिका घनकचरा व्यवस्थापन विभागाचे सहकार्य आहे.

पुणे - सकाळ सोशल फाउंडेशन व पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेतर्फे आणि रोटरी क्‍लब ऑफ शनिवारवाडा यांच्या सहकार्याने अनंत चतुर्दशीच्या दिवशी गुरुवारी (ता. १२) पुण्यातील प्रमुख विसर्जन घाटांवर निर्माल्य संकलन मोहीम राबविण्यात येणार आहे. या उपक्रमास पुणे महापालिका घनकचरा व्यवस्थापन विभागाचे सहकार्य आहे. 

पुणे मध्यवर्ती सहकारी बॅंक आणि रोटरी क्‍लब ऑफ शनिवारवाडा हे या उपक्रमाचे प्रायोजक आहेत. हा उपक्रम राबविण्याचे ‘सकाळ सोशल फाउंडेशन’चे सलग सहावे वर्ष आहे.

मुठा नदीवरील सिद्धेश्‍वर-वृद्धेश्‍वर घाट, भिडे पूल, पांचाळेश्‍वर घाट, एस. एम. जोशी घाटांवर (नदीकडील दोन्ही बाजू) विद्यार्थी स्वयंसेवक निर्माल्य संकलन व त्याबाबत जनजागरण करतील. तसेच, प्रत्येक घाटावर सकाळ सोशल फाउंडेशनकडून जनजागृती व प्रबोधनात्मक निर्माल्य संकलनाचे फलक लावण्यात येणार आहेत. 

या उपक्रमात रोटरी क्‍लब अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या रोट्रॅकट ग्रुपचे विद्यार्थी, सिंहगड कॉलेज ऑफ अभियांत्रिकीचे राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे विद्यार्थी, सकाळ-निर्धार स्वयंसेवक व विद्यार्थी सहायक समितीचे विद्यार्थी स्वयंसेवक म्हणून सहभागी होणार आहेत. 

या मोहिमेदरम्यान संकलित केलेल्या निर्माल्याचे महापालिकेच्या वतीने पुनःप्रक्रियेद्वारे खतामध्ये रूपांतर करण्यात येते. सकाळ सोशल फाउंडेशनच्या निर्माल्य संकलन उपक्रमात आपणही स्वयंसेवक म्हणून सहभागी होऊ शकता.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Anant Chaturdashi Nirmalya Collection Campaign by Sakal Social Foundation