...लग्नघरी पोचली मृत्यूचीच बातमी !

...लग्नघरी पोचली मृत्यूचीच बातमी !

पुणे - अनंता खेडकर याच्या चुलत भावाचे लग्न ८ मार्चला होते. त्यासाठी अनंता गावाकडे जाणार होता. दोन दिवसांपूर्वीच त्याने गावाकडे आई-वडिलांना फोन करून मी महाशिवरात्रीनंतर गावाकडे येईन, असे सांगितले. पण, दोन दिवसांनी अनंता या जगातच नसल्याची खबर मात्र त्याच्या घरी धडकली !

अनंता हा बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्‍यातील ढोपरगावचा रहिवासी. वृद्ध आई-वडील, दोन भाऊ आणि दोन बहिणी, असा त्याचा परिवार आहे. त्यापैकी मोठ्या बहिणीचे लग्न झाले. कुटुंबाचा चरितार्थ चालविण्यासाठी तो मित्रांसमवेत पुण्याला आला. त्याने कात्रज येथील महाविद्यालयाच्या कॅंटीनमध्येच काम करण्यास सुरवात केली.

दिवाळीमध्ये तो गावाला गेला होता. त्यानंतर तो गावी गेला नव्हता. ८ मार्चला अनंताच्या चुलत भावाचे लग्न होते. त्यामुळे त्याने महाशिवरात्रीला त्याच्या आईला फोन केला. भावाच्या लग्नासाठी मी गुरुवारी गावाकडे येईन, असे त्याने सांगितले होते. पण, घडले उलटेच. अनंता घरी गेला नाही. त्याला मृत्यूने झोपेतच गाठल्याची खबर आई-वडिलांकडे पोचली. त्यामुळे लग्नघरी सुरू असलेल्या आनंद सोहळ्यावर दु-खाची छाया पसरली. दरम्यान, अनंता व अजय या कामगारांच्या मृत्यूस कॅंटीनचालकच जबाबदार आहे, असा पवित्रा अनंताचे नातेवाईक राजेंद्र ढवळे यांनी घेतला. त्यांनी मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com