गाडगीळ यांच्या निधीतून पीएमपीची बस

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 22 जुलै 2019

काँग्रेसचे आमदार अनंतराव गाडगीळ यांच्या स्थानिक विकास निधीतून पीएमपीच्या ताफ्यात बस दाखल झाली असून, त्याचे लोकार्पण शनिवारी करण्यात आले.

पुणे - काँग्रेसचे आमदार अनंतराव गाडगीळ यांच्या स्थानिक विकास निधीतून पीएमपीच्या ताफ्यात बस दाखल झाली असून, त्याचे लोकार्पण शनिवारी करण्यात आले. 

या वेळी पीएमपीचे मुख्य अभियंता सुनील बुरसे, राजेंद्र भणगे, नरेंद्र व्यवहारे, बाळासाहेब आमराळे, अरुण वाघमारे, मंगेश निरगुडकर, गोपाळ पायगुडे, बाळू राऊत, साहिल राऊत, किशोर मारणे, सुनील पडवळ, हणमंत राऊत या वेळी उपस्थित होते. 

पीएमपीच्या ताफ्यात दाखल झालेल्या या बसमध्ये ४० कुशनच्या सीट आहेत. ती सीएनजीवर धावणार आहे. सुरक्षेसाठी अलार्म, डिजिटल बोर्ड अशा सुविधा आहेत. ही बस सध्या कोथरूड डेपो ते पुणे स्टेशन या मार्गावर धावणार आहे. पीएमपीला आणखी एक बस दिली जाणार असून, त्यासाठी २३ लाख रुपयांचे पत्र पीएमपीला दिले आहे, असे गाडगीळ यांनी सांगितले. 

दरम्यान, ससून रुग्णालयात रुग्णांसाठी फाऊलर बेड घेण्यासाठी १० लाखांचा निधी हस्तांतरित केला आहे. त्यामध्ये अद्ययावत १० खाट घेतल्या जाणार आहेत, असेही गाडगीळ यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Anantrao Gadgil Fund PMP Bus