अंधाधुन'मुळे मी पुणं अनुभवलं : तब्बू 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 13 जानेवारी 2019

पुणे : मी माझ्या कारकिर्दीत सर्व प्रकारचे चित्रपट केले, पण दिग्दर्शक श्रीराम राघवन यांच्याबरोबर काम करण्याचे माझे पहिल्यापासून स्वप्न होते. ते स्वप्न "अंधाधुन' चित्रपटामुळे पूर्ण झाले. त्यातील माझ्या भूमिकेला "ग्रे शेड' असली, तरी एक अभिनेत्री म्हणून ती भूमिका माझ्या अत्यंत जवळची आहे, अशी भावना अभिनेत्री तब्बू यांनी "पिफ फोरम'मध्ये व्यक्त केली. या चित्रपटामुळे मला पुणे शहर अनुभवता आलं. पुण्यात राहता आलं, अशी आठवण तब्बू यांनी सांगितली. 

पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या (पिफ) दुसऱ्या दिवशी पिफ फोरममध्ये "अंधाधुन' चित्रपटातील कलाकारांशी गप्पा आयोजित केल्या होत्या. त्यामध्ये श्रीराम राघवन, तब्बू, पटकथा लेखक पूजा लढ्ढा सहभागी झाले होते. 

श्रीराम राघवन म्हणाले, "अंधाधुनचे सर्व चित्रीकरण हे पुण्यात झाले. मी पुण्याचा, त्यातही एफटीआयआयचा विद्यार्थी असल्याने पुण्यात चित्रपट करणे हे खूप आनंददायी व समाधानकारक होते. वेगवेगळ्या भूमिकांचे धागे विणत तयार केलेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांनी खूप चांगला प्रतिसाद दिला.पिफच्या पहिल्या दिवशी 'अंधाधुन'चा विशेष खेळ आयोजित केला होता. त्यालाही या सर्व कलाकारांची उपस्थिती होती. 

शॉर्टफिल्मवरून कल्पना सुचली 
"शॉर्टफिल्म' हा प्रकार माझ्या अत्यंत जिव्हाळ्याचा आहे. अशाच एका शॉर्टफिल्मवरून मला अंधाधुनची कथा सुचली. त्यावरून पुढे एक चांगला चित्रपट होऊ शकेल व त्यातील अंध व्यक्तिरेखेला न्याय देता येईल, तसेच चित्रपट अधिक खुलवता येईल, या कल्पनेतून या चित्रपटाचा जन्म झाला. 
- श्रीराम राघवन, दिग्दर्शक 
 
Web Title: andhadhun movie help me to know pune said Tabbu