मावळातील आंद्रा धरण शंभर टक्के भरले

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 25 जुलै 2018

टाकवे बुद्रुक - आंदर मावळातील मंगरूळ जवळील आंद्रा धरण शंभर टक्के भरले असून, सांडव्यावरून विसर्ग सुरू झाला आहे.

धरण परिसरात दमदार पाऊस पडल्याने धरण पूर्ण भरून सांडव्यावरून पाणी वाहू लागले. काल पर्यत धरण परिसरात ६३६ मिलीमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. 
तीन टीएमसी पाणीसाठवणूक क्षमता असलेल्या धरणात आज अखेर जलाशयाची पातळी ६१४ मीटर आहे. जलाशयाची पातळी इथपर्यंत पोहचली की, सांडव्यावरून विसर्ग सुरू होतो. धरणात एकूण पाणी साठा ८३.३० दशलक्षघनमीटर असून त्यापैकी उपयुक्त साठा ८२.७४दशलक्षघनमीटर आहे. आंद्रा धरणाचे उपअभियंता अनंता हांडे यांनी ही माहिती दिली. 

उमेश यादव व एकनाथ भुजबळ येथील कर्मचारी आहेत. या धरणाच्या पायथ्याशी वीजनिर्मिती प्रकल्प सुरू करण्याचा प्रस्ताव अद्याप लालफितीत अडकून पडला आहे. तर वीस वर्षापासून धरणग्रस्तांचे प्रलंबित प्रश्न शासन दरबारी धूळखात पडले आहेत. त्यात या धरणातून पिंपरी चिंचवड शहराला पाणी पुरवठा करण्यात येणार असल्याची भूमिका शासनाने स्पष्ट केल्यावर धरणग्रस्तांनी त्यास विरोध दर्शविला आहे. 

Web Title: Andra dam in Mawl filled one hundred percent