भाऊबिजेचा ‘शिमगा’!

Sakal-Exclusive
Sakal-Exclusive

अंगणवाडी सेविकांची खंत; दिवाळीपूर्वी बोनसची मागणी 
पुणे - ‘अंगणवाडी सेविका म्हणून ११ वर्षे काम करतेय. दरवर्षी दोन हजार रुपये भाऊबीज मिळते; परंतु त्यासाठी दरवेळी आंदोलन करावे लागते. शिक्षक, प्राध्यापकांना सातव्या वेतन आयोगामुळे पगारही जास्त. आमदार, खासदारांना पगार द्यायला पैसे भरपूर; पण आम्हाला काम जास्त आणि मानधन कमी. भाऊबीज दरवर्षी दिवाळीऐवजी शिमग्याला मिळते. राज्य सरकारने यंदा दिवाळीत वेळेवर मानधनाएवढी साडेआठ हजार रुपये भाऊबीज द्यावी...’’

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

अंगणवाडी सेविका सुनीता दुगल सांगत होत्या. कोरोनाच्या कालावधीत अंगणवाडी सेविका, आशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तकांनी घरोघरी जाऊन आरोग्य सर्वेक्षणाचे काम केले आहे. अंगणवाडी सेविका तुटपुंज्या मानधनावर काम करीत आहेत. ‘माझे कुटुंब-माझी जबाबदारी’ अभियानातही त्या महत्त्वपूर्ण योगदान देत आहेत. अंगणवाडी सेविकांना महिला व बालकल्याण विभागाकडून भाऊबीज दिली जाते. यंदाच्या दिवाळीत सरकारने किमान एका महिन्याच्या मानधनाएवढी रक्‍कम दिवाळी बोनस (भाऊबीज) म्हणून द्यावी. तसेच, आशा स्वयंसेवकांना अडीच हजार रुपये आणि गटप्रवर्तकांना पाच हजार रुपये द्यावेत, अशी मागणी संघटनेने केली आहे.

यावर्षी दिवाळी १४ नोव्हेंबरपासून सुरू होत आहे; परंतु सरकारने भाऊबिजेबाबत सूतोवाच केलेले नाही. त्यामुळे राज्यातील सुमारे दोन लाख अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांमध्ये नाराजी आहे. सरकारने दिवाळीपूर्वी भाऊबीज द्यावी, अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांच्याकडे करण्यात आली आहे, असे महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कृती समितीचे अध्यक्ष एम. ए. पाटील आणि शुभा शमीम यांनी सांगितले.

पुणे शहर व जिल्हा स्थिती 

  • ११ हजार ६६४ - अंगणवाडी सेविका आणि मदतनीस
  • ३३३२ - आशा स्वयंसेविका
  • १५१ - गटप्रवर्तक

अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तकांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष होत असल्यामुळे सरकारच्या कारभारावर ते नाराज आहेत. त्यांना दिवाळीपूर्वी भाऊबीज द्यावी. 
- नीलेश दातखिळे, निमंत्रक, महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कृती समिती

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com