अंगणवाडी सेविका करणार सव्वा लाख मोबाईल परत

ॲपवरील २२ तक्त्यांमध्ये माहिती भरणे झाले डोकेदुखीचे
pune
punesakal

येरवडा : अंगणवाडी सेविकांना दिलेले मोबाईल निकृष्ट दर्जाचे आहेत. केंद्र सरकारने दिलेल्या ‘पोषण ट्रॅकर’ या सदोष आहे. राज्य सरकार नवीन मोबाईल किंवा टॅब निधी अभावी देत नाही. त्यामुळे राज्यातील सव्वा लाख सेविकांनी मोबाईल सरकारला परत करण्याच्या अभियानाला मंगळवारी मंगळवार पेठेतील प्रकल्प क्रमांक १ पासून सुरवात झाली. (Pune News)

‘अधिकाऱ्यांना पेन्शन, आम्हाल टेन्शन,’ मानधन नको, पगार द्या, अशा घोषणा देत अंगणवाडी सेविका मंगळवार पेठेतील अेकात्मिक बाल विकास प्रकल्पाच्या कार्यालया समोर जमा झाल्या होत्या. यावेळी अंगणवाडी कर्मचारी सभेचे अध्यक्ष नितीन पवार म्हणाले,‘‘ अंगणवाडीच्या कामकाजासाठी सरकारने दिलेला मोबाईल अत्यंत निकृष्ट दर्जाचे आहेत. तो जुना झाल्यामुळे सतत नादुरुस्त होतो व त्याच्या दुरुस्तीसाठी चार ते पाच हजार रुपयांचा खर्च येतो. तो सेविकांकडून वसूल केला जातो. सरकारने दिलेले हे सर्व जुने मोबाईल परत घेऊन नवीन, चांगल्या दर्जाचे व क्षमतेचे आधुनिक मोबाईल किंवा टॅब द्यावेत.’’

pune
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अटक

‘‘ अेकात्मिक बाल विकास प्रकल्प आयुक्तालातून मोबाईल संच परत घेऊ नये अशा सुचना देण्यात आल्या आहेत. अंगणवाडी सेविकांनी मोबाईल कार्यालयात दिले आहेत. मात्र त्याची पोच दिलेली नाही. सेविकांनी नोडल अधिकारी किंवा आयुक्तालयात मोबाईल जमा करावेत द्यावेत.

पोषण ट्रॅकर ॲप सदोष

केंद्र सरकारने अंगणवाडी सेविकांना दिलेला पोषण ट्रॅकर ॲप हा सदोष आहे. मोबाईलमध्ये रॅम कमी असल्यामुळे तो डाऊनलोड होत नाही. इंग्रजीत असलेल्या ॲपमध्ये डिलिटचा पर्याय नसणे, वर्गवारी किंवा लाभार्थी गट न बदलणे, दैनंदिन करण्याचे काम किंवा द्यायच्या सेवांबाबत ’कॅस’प्रमाणे कोणतेही मार्गदर्शन न येणे, भरण्याची पद्धत अतिशय किचकट असणे अशा त्रुटींमुळे कामात मदत होण्याऐवजी उलट ओझे वाढले असल्याचे पवार यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com