अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे पुण्यात आंदोलन 

डी. के. वळसे पाटील 
शनिवार, 11 ऑगस्ट 2018

मंचर: पुणे जिल्ह्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी शुक्रवारी (ता. 10) थाळीनाद मोर्चा व ठिय्या आंदोलन पुणे येथे उपायुक्त महिला व बालविकास विभाग व पुणे जिल्हा परिषद कार्यालयासमोर केले. 

मंचर: पुणे जिल्ह्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी शुक्रवारी (ता. 10) थाळीनाद मोर्चा व ठिय्या आंदोलन पुणे येथे उपायुक्त महिला व बालविकास विभाग व पुणे जिल्हा परिषद कार्यालयासमोर केले. 

सुरवातीला डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ अंगणवाडी सेविका जमा झाल्या होत्या. दुपारी बारा वाजता महिला बालविकास विभागाच्या कार्यालयावर थाळीनाद मोर्चा नेण्यात आला. तेथे ठिय्या आंदोलन केले. यावेळी शासनाच्या वेळकाढूपणा बद्दल नाराजी व्यक्त करणाऱ्या घोषणा देण्यात आल्या. आंदोलकांच्या भावना तीव्र होत्या. त्यानंतर पुणे जिल्हा परिषदेच्या कार्यालयावर मोर्चा नेण्यात आला. महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाचे पुणे जिल्हाचे सचिव निलेश दातखिळे, सहसचिव विठ्ठल करंजे, सुमन फदाले, शारदा शिंदे, रंजना कानडे, नयना वाळूंज, सोनाली पावडे यांनी आंदोलनाचे नेतृत्व केले. पुणे जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका व मदतनीस आंदोलनात सहभागी झाल्या होत्या.

25 पेक्षा कमी मुले असतील तर ती अंगणवाडी केंद्र बंद करून शेजारच्या अंगणवाडी केंद्रात समाविष्ट करन्यात यावा असा काढण्यात आलेला आदेश त्वरित रद्द करावा, लाईन लिस्टिंगच्या व आधार नोंदणीच्या कामाची सक्ती बंद करावी, नगरपालिका व महापालिकेकडे अंगणवाडी केंद्राचे होणारे हस्तांतरणचा आदेश त्वरित रद्द करावा. मिनी अंगणवाडी केंद्रांचे रूपांतर नियमित अंगणवाडी केंद्रात करावे, अंगणवाडी केंद्रांचे भाडे नवीन जी आर प्रमाणे द्यावे, बचत गटाची आहाराची बिले व फेडरेशन अंतर्गत आहारातील थकीत इंधन बिले देऊन इंधन दरात वाढ करा, सेवानिवृत्त झालेल्याना एक रक्कमी सेवासमापतीच्या लाभाची रक्कम तातडीने द्या आदी मागण्यांचे निवेदन महिला बाल विकास विभागाचे उपायुक्त दिलीप हिवरळे, जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण सभापती राणी शेळके, उपमुख्य कार्यकारी अधिकारी दीपक चाटे यांना सुनीता लोंढे, रेखा कांबळे, मंजुळा झेंडे, स्वाती भेगडे, छाया भुजबळ, बिस्मिल्ला तांबोळी यांच्या हस्ते देण्यात आले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Anganwadi workers protest in Pune