अंगारकी चतुर्थीनिमित्त श्री महागणपती अष्टविनायक मंदिराला फुलांची सजावट | Ranjangav Ganpati | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ranjangav ganpati
अंगारकी चतुर्थीनिमित्त श्री महागणपती अष्टविनायक मंदिराला फुलांची सजावट

अंगारकी चतुर्थीनिमित्त श्री महागणपती अष्टविनायक मंदिराला फुलांची सजावट

रांजणगाव गणपती - अंगारकी चतुर्थीनिमित्त श्री महागणपती अष्टविनायक मंदिराला फुलांची सजावट करण्यात आली होती. मोठ्या प्रमाणात भावीकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. डाळींब व केळीचा महानैवेद्य ठेवण्यात आला होता.

श्री क्षेत्र रांजणगाव गणपती देवस्थान ट्रस्ट च्या वतीने पहाटे 5 वाजता अभीषेक व नैमित्तिक पूजा करण्यात आली. त्यानंतर मंदिर दर्शनासाठी खुले करण्यात आले. या वर्षातील अखेरची अंगारकी चतुर्थी असल्याने भावीकांनी मोठ्या

प्रमाणात गर्दी केली होती. देवस्थानच्या वतीने श्री समोर 12 वाजता महापूजा व महानैवेद्य ठेवण्यात आला. भावीक संदिप नवले यांच्या वतीने 1001 डाळींब तर भावेश कामदार यांचे वतीने 501 केळींचा महानैवेद्य श्री महागणपतीला ठेवण्यात आला. त्यावेळी देवस्थानचे विश्वस्त डॅा. संतोष दुंडे, प्रा. नारायण पाचुंदकर, अॅड. विजयराज दरेकर, व्यवस्थापक बाळासाहेब गोऱ्हे पुजारी आदी उपस्थित होते.

हेही वाचा: राज्यातील सर्व शाळांमध्ये ‘माझे संविधान, माझा अभिमान’उपक्रम

नानासाहेब दिनकर पाचुंदकर पाटील यांच्या वतीने मंदिर परीसरात फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती. मंदिराभोवती राजू जुन्नरकर (आळंदी) यांनी मनमोहक रांगोळी काढली होती. 7 आक्टोंबर ला दर्शनासाठी मंदिर खुले करण्यात आले होते. त्यानंतर या अंगारकी चतुर्थीला भावीकांनी दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. रांजणगाव एमआयडीसी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक बलवंत मांडगे, पोलिस उपनिरीक्षक सुहास रोकडे यांनी मंदिराभोवती बंदोबस्त ठेवला होता. भावीकांच्या गर्दीने हार तुरे, नारळ या व्यवसायीकांच्या दुकांनामध्ये गर्दी वाढली होती. दर्शन रांगेची व्यवस्था, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था देवस्थानच्या वतीने ठेवण्यात आली होती. आहमदनगर येथील अष्टविनायक रक्तपेढी च्या वतीने रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.

loading image
go to top