डॉ. आंबेडकर जयंतीच्या निमित्ताने अनिल जाधव यांनी साधला जनतेशी संवाद

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 14 एप्रिल 2019

- डॉ.आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली
-  डॉ. आंबेडकर भवन'चा विस्तार करणार  : अनिल जाधव 
- वंचित बहुजन आघाडीला मतदान करण्याचे भावनिक आवाहन

पुणे : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार अनिल जाधव यांनी पुणे स्टेशन येथे डॉ.आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली.  त्याचबरोबर दिवसभर येथे येणाऱ्या सामाजिक कार्यकर्ते आणि जनतेशी त्यांनी खुला संवाद साधला. या वेळी दलित समाजाच्या विविध समस्या जाणून घेतल्या शिवाय त्या सोडविण्यासाठी आपण प्रयत्नशील राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी एमआयएमचे शहराध्यक्ष लियाकत शेख, भारीपचे शहराध्यक्ष अतुल बहुले, महिला आघाडीच्या अनिता चव्हाण, नवनीत अहिरे, इब्राहिम खान या सह वंचित बहुजन आघाडी आणि मित्रपक्षाचे, संघटनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

'आंबेडकर भवन'चा विस्तार करणार  : अनिल जाधव 
या वेळी पुणे स्टेशन येथील 'आंबेडकर भवन'ची जागा अपुरी असून बऱ्याच समस्या या भवनमध्ये असल्याचे जाधव यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी आपण निवडून आल्यानंतर आंबेडकर सांस्कृतिक भवन परिसरातील शासकीय जागा ताब्यात घेऊन भवनचा विस्तारीकरण करणार असल्याचे जयंती दिनी सर्व समाजाला आश्वासन दिले. तसेच प्रकाश आंबेडकर यांचे हात मजबूत करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीला मतदान करण्याचे भावनिक आवाहन अनिल जाधव यांनी केले. यावेळी अभिवादन करण्यासाठी आलेल्या लोकांनी अनिल जाधव यांना अत्यंत उस्फूर्त प्रतिसाद दिला.

Web Title: Anil Jadhav interacted with the people on the occasion of Dr. Ambedkar birth Anniversary