'एक दिवसाचा मुख्यमंत्री होण्याबाबत मला अनेकांनी विचारले'

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 3 नोव्हेंबर 2019

सध्या महाराष्ट्राच्या सत्तेचा तिढा सुटण्याची चिन्ह अद्याप तरी दिसत नाही. याच पार्श्वभूमीवर अभिनेता अनिल कपूर यांना एक दिवसाचा मुख्यमंत्री होणार का? असे विचारले असता त्यांनी मजेशीर उत्तर दिले. ते म्हणाले, ''एक दिवसाचा मुख्यमंत्री होण्याबाबत मला अनेकांनी विचारले पण, ''मी नायक आहे हे माझ्यासाठी चांगले आहे. शेवटपर्यत नायकच राहणार, असे त्यांनी सांगितले.

पुणे : 'मला पुणे खूप आवडतं, मी पुण्यात खुप शूट केलं आहे. मला पुण्यात राहायला आवडेल अशी इच्छा अभिनेता अनिल कपूर यांना पुण्यात व्यक्त केली. पुण्यातील 'मलबार हिल' या दुकानाचे उद्धघाटन अभिनेता अनिल कपुर यांच्या हस्ते झाले आहे. यावेळी त्यांनी पुणेकरांसोबत गाण्यावर ठेका धरुन पुणेकरांना खुष केले. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ' 

नायक या लोकप्रिय चित्रपटात अनिल कपूर एक दिवसाचे मुख्यमंत्री झाले होते. एक दिवसाचा मुख्यमंत्री होऊनही राज्यात किती बदल होऊ शकतात हे या चित्रपटात पहायला मिळाले होते. सध्या महाराष्ट्राच्या सत्तेचा तिढा सुटण्याची चिन्ह अद्याप तरी दिसत नाही. याच पार्श्वभूमीवर अनिल कपूर यांना एक दिवसाचा मुख्यमंत्री होणार का? असे विचारले असता त्यांनी मजेशीर उत्तर दिले. ते म्हणाले, ''एक दिवसाचा मुख्यमंत्री होण्याबाबत मला अनेकांनी विचारले पण, ''मी नायक आहे हे माझ्यासाठी चांगले आहे. शेवटपर्यत नायकच राहणार, असे त्यांनी सांगितले.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Anil Kapoor Speaks About Becoming CM For One Day