मोकाट जनावरांमुळे अपघात

पिंपरी - रस्त्यावरील भटकी जनावरे.
पिंपरी - रस्त्यावरील भटकी जनावरे.

पिंपरी - मोकाट जनावरे अचानक रस्त्यात आल्याने तसेच भटकी कुत्री मागे लागल्याने अनेकांचे अपघात झाले आहेत. त्यांचा बंदोबस्त करावा, अशी नागरिकांची मागणी आहे.

शहरात सात हजार मोकाट जनावरे असल्याची माहिती महापालिकेने दिली. फेरीवाल्यांनी टाकलेला भाजीपाला खाण्यासाठी ती रस्त्यावरून फिरतात. त्यांना पकडून पांजरपोळ येथे ठेवले जाते. मालक असेल तर ते दंड भरून जनावरांना सोडवून घेऊन जातात.

बैल गेला जिवानिशी
भोसरी येथील उड्डाण पुलावर भरधाव मोटारीच्या समोर आलेल्या बैलाला वाचविताना धक्‍का लागला. त्यामुळे घाबरलेला बैल दुभाजकाच्या दुसऱ्या बाजूला पळाला. त्याचवेळी भरधाव वेगात आलेल्या दुचाकीची धडक त्याला लागली आणि त्याचा मृत्यू झाला. तसेच बैलाला धडकल्याने दुचाकीस्वारही गंभीर जखमी झाला. मोकाट जनावर असल्याने कोणावर कारवाई करणार, असा प्रश्‍न पोलिसांसमोर निर्माण झाला. 

भटक्‍या कुत्र्यांमुळे अपघात
शहराच्या कोणत्याही गल्लीतून दुचाकीस्वार जाताना भटकी कुत्री त्याच्या मागे लागतात. त्यांच्यापासून वाचण्यासाठी पळताना अनेकदा दुचाकीस्वाराचा अपघातही झाला आहे. मोकाट जनावर रस्त्यात आल्याने माझा अपघात झाला. सुदैवाने मागून वाहन येत नसल्याने थोडक्‍यात बचावलो. महापालिकेने मोकाट जनावरांवरील कारवाई तीव्र करावी., तसेच अपघातास कारणीभूत ठरणाऱ्या जनावरांच्या मालकांवर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी भोसरीतील विक्रम शिंदे यांनी केली.

लोकसंख्येच्या तीन टक्के भटकी कुत्री असतात. त्यानुसार शहरात सध्या ७५ हजार भटकी कुत्री असण्याची शक्‍यता आहे. त्यांची संख्या नियंत्रणात आणण्यासाठी महापालिका संतती नियमनाची शस्त्रक्रिया करते. 
- डॉ. अरुण दगडे, पशुवैद्यकीय अधिकारी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com