भुकूमला वाट चुकलेल्या चितळ हरणाचा मोकाट कुत्र्यांनी घेतला जीव

भुकूम येथील स्काय आय स्टार टाउन सोसायटीच्या परिसरातील राम नदी मध्ये मोकाट कुत्र्यांनी चावा घेऊन एका चितळ जातीच्या हरणाचा जीव घेतला
animal forest department dogs attack on deer that had missing route Ram River Pirangut
animal forest department dogs attack on deer that had missing route Ram River Pirangutsakal

पिरंगुट : भुकूम ( ता. मुळशी ) येथील स्काय आय स्टार टाउन सोसायटीच्या परिसरातील राम नदी मध्ये मोकाट कुत्र्यांनी चावा घेऊन एका चितळ जातीच्या हरणाचा जीव घेतला. परिसरातील नागरिक आज सकाळी चालण्याच्या व्यायामसाठी गेले होते. त्यावेळी त्यांना राम नदीच्या परिसरात काही कुत्र्यांचा जोरजोराने भुंकण्याचा आवाज आला. त्या ठिकाणी त्यांनी जाऊन पाहिले असता काही कुत्र्यानी हरणावर हल्ला करताना दिसली.

नागरिकांनी त्या कुत्र्यांना हाकलून दिले. त्यानंतर वन विभागाशी संपर्क साधून त्या मृत हरणाला ताब्यात दिले. याबाबत नागरिकांनी सांगितले की, भूकूम च्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात हरणे येत असतात परंतु परिसरात नागरीकरण वाढल्यामुळे याठिकाणी मोकाट कुत्र्यांचे प्रमाणही खूपच वाढलेले आहे .या मोकाट कुत्र्यांचा स्थानिक नागरिकांनाही मोठ्या प्रमाणात त्रास होत असतो .

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com