जट निर्मूलनाची शंभरी

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 11 एप्रिल 2019

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या (अंनिस) माध्यमातून हाती घेण्यात आलेल्या जट निर्मूलन मोहिमेने बुधवारी शंभरी गाठली आहे. ‘अंनिस’च्या जिल्हा कार्याध्यक्षा नंदिनी जाधव यांच्या प्रयत्नांतून गेल्या चार वर्षांपासून हा उपक्रम सुरू आहे.

पुणे - महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या (अंनिस) माध्यमातून हाती घेण्यात आलेल्या जट निर्मूलन मोहिमेने बुधवारी शंभरी गाठली आहे. ‘अंनिस’च्या जिल्हा कार्याध्यक्षा नंदिनी जाधव यांच्या प्रयत्नांतून गेल्या चार वर्षांपासून हा उपक्रम सुरू आहे. 

भोर येथील जनाबाई तारू यांच्या डोक्‍यामध्ये दोन वर्षांपूर्वी गुंता झाला होता. त्यातून जट वाढत गेली.

मात्र जटेबाबत त्यांच्या मनातील भीती पतीच्या निधनानंतर कमी झाली. त्यामुळे त्या जट काढण्यास तयार झाल्या. जाधव यांनी राज्यातील सुमारे १०८ महिलांची जटमुक्ती केली. तर जिल्ह्यातील हा आकडा शंभरावर पोचला आहे. तारू म्हणाल्या, ‘‘ही जट देवीची आहे. ती काढू नकोस, असे मला अनेकांनी सांगितले. त्यामुळे जट काढायला मला भीती वाटायची. नंदिनी जाधव जट काढण्याचे काम करीत असल्याचे वृत्तपत्रांतून समजले. मी त्यांच्याशी संपर्क केला. अखेरीस माझी जट काढली. आता डोके एकदम हलके झाले आहे.’

Web Title: Anis Jat Janabai Taru