अनिशमुळे वटवाघूळाच्या पिलास मिळाले जीवदान

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 2 मे 2018

अनिश हा त्याच्या मित्राबरोबर संध्याकाळी सोसायटीत व्हॉलीबॉल खेळत होता. साडेसात वाजण्याच्या सुमारास सोसायटीतील पार्किंग वटवाघूळाचे पिल्लू  जमिनीवर पडलेले दिसले. 

वारजे माळवाडी : वेस्टएंड रेसिडन्सी येथे राहणारा बारा वर्षाच्या अनिश आनंद अगावणे वटवाघूळाच्या पिलास मिळाले जीवदान. 

अनिश हा त्याच्या मित्राबरोबर संध्याकाळी सोसायटीत व्हॉलीबॉल खेळत होता. साडेसात वाजण्याच्या सुमारास सोसायटीतील पार्किंग वटवाघूळाचे पिल्लू  जमिनीवर पडलेले दिसले. 

सरपटत ओरडत होते. त्याला उडता येत नव्हते. सर्व मुलांनी ते पहिले. आनंदला त्या पिल्ला मदत करावी असे त्याला वाटले. तो पळत वडील आनंद अगावणे यांना जाऊन सांगितले. 
वटवाघूळ अशुभ असते असे काही मुले म्हणत होती. आपण त्याला मदत केली तर चालेल का, त्याच्या वडिलांनी काही पक्षी मित्रांना फोन करून प्रतीक महामुनी यांचा नंबर मिळाला. 
ते तसेच राहिले असते तर ते सोसायटीतील वाहनांच्या चाकाखाली किंवा कुत्रे, मांजर, अन्य पक्षी यांच्या तावडीत सापडले असते. म्हणून आम्ही त्यास पक्षी मित्राच्या ताब्यात देण्याचे ठरविले. त्यानुसार ते कात्रज येथील अनाथालयात पोचले. त्याला माझ्यामुळे मदत झाली ही भावना अनिशच्या चेहऱ्यावर होती. अनिश सातवीत शिकत आहे, असे आनंद आगवणे यांनी 'सकाळ' शी बोलताना सांगितले.

दरम्यान, हे पिल्लू लहान ते उडण्याचा प्रयत्न करीत असताना ते पडले. त्याला थोडा मार लागला असेल. त्यामुळे ते घाबरले आहे असे अनाथालयातून 'सकाळ'ला ही माहिती दिली.

Web Title: For Anish A Bird Gets llife