पुणे - वाखारीच्या उपसरपंचपदी अनिता गोरगल विजयी

रमेश वत्रे
सोमवार, 13 ऑगस्ट 2018

केडगाव : वाखारी (ता. दौंड) ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी अनिता संभाजी गोरगल यांची सहा विरूद्ध पाच मतांनी निवड झाली. दोन्ही उमेदवारांना समान मते पडल्याने सरपंचाचे मत निर्णायक ठरले. त्यामुळे सरीता इनामदार यांचा पराभव झाला. अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी विकास झाडगे यांनी दिली. पुणे जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाच्या सभापती राणी शेळके यांना त्यांच्या गावात सरपंच, उपसरपंच 
निवडणुकीत अपयश आले.    

वाखारी ग्रामपंचायतीत 9 जागांसाठी निवडणूक झाली होती. निवडणुकीत आमदार राहुल कुल समर्थक विरूद्ध माजी आमदार रमेश थोरात समर्थकांमध्ये अटीतटीची लढत झाली होती. निवडणुकीत कुल गटाला चार जागा तर थोरात गटाला पाच जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे आजच्या उपसरपंचपदासाठीच्या निवडणुकीबाबत उत्सुकता होती. कुल समर्थक आणि भीमा पाटस कारखान्याचे माजी संचालक धनाजी शेळके यांनी ग्रामपंचायतीवर गेल्या 25 वर्षापासून निर्विवाद वर्चस्व कायम राखले आहे. या निवडणुकीत त्यांच्या पत्नी शोभा शेळके या सरपंचपदासाठी निवडून आल्या आहेत. 

मागील कार्यकारी मंडळाची मुदत आज संपल्याने शोभा शेळके यांनी सरपंचपदाचा कार्यभार स्वीकारला. त्यांच्याच अध्यक्षतेखाली आजची उपसरपंचपदाची निवडणूक झाली. या पदासाठी अनिता संभाजी गोरगल (कुल गट)  व सरीता गणेश इनामदार (थोरात गट) यांनी उमेदवारी अर्ज भरले होते. ग्रामपंचायतीत सरपंचासह दहा सदस्य आहेत. गोरगल व इनामदार यांना प्रत्येकी पाच मते पडली. त्यानंतर सरपंच शोभा शेळके यांचे निर्णायक मत गोरगल यांना मिळाल्याने त्या सहा विरूद्ध पाच मतांनी निवडून आल्या. मागणीनुसार गुप्त मतदान घेण्यात आले. यावेळी मंडल अधिकारी विजय खारतोडे, निवडणूक निरीक्षक एम.एस.टकले, पोलिस हवलदार जितेंद्र पानसरे आदी उपस्थित होते.   

Web Title: anita gorgal elected as deputy chief of wakhari grampanchayat