मैला साफ करणाऱ्या रोबोला अंजनी माशेलकर नवकल्पना पुरस्कार

Anjani Mashelkar Innovation Award for Manhole cleaning robot
Anjani Mashelkar Innovation Award for Manhole cleaning robot

पुणे : स्वातंत्र्यानंतर ७० वर्षांनी सुद्धा मैला सफाईसाठी माणसांचे जीव गमवावे लागणे आपल्यासाठी मोठ्या दुर्दैवाची गोष्ट आहे. भविष्याच्या पुढे जाऊ पाहणाऱ्या तंत्रज्ञानापेक्षा समाजातील शेवटच्या घटकाचे जीवन सुसह्य करणाऱ्या तंत्रज्ञानातूनच समाजपरिवर्तन शक्य होईल, असे मत ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी व्यक्त केले. 

पुण्याचा महापौर तयारीचाच हवा! 

डॉ.माशेलकर म्हणाले,"देशामध्ये तीन कोटी बंदिस्त गटारी आहे. त्यांच्या सफाईसाठी लाखो सफाई कामगार स्वतःचा जीव धोक्यात घालून काम करतात. त्यातील बहुतांश  लोक तीस वर्षांपेक्षा जास्त काळ टिकत नाही. गांधीजी स्वच्छता ही स्वातंत्र्यापेक्षा महत्वाची आहे असे म्हणत. त्यामुळे सफाई कामगारांचे कष्ट सुसह्य करणाऱ्या या रोबोला पुरस्कार देताना आम्हाला आनंद होत आहे."

#TransportIssue पुण्यातील अपघातांची संख्या घटली

पुणे इंटरनॅशनल सेंटरच्या वतीने सामाजिक नवतंत्रज्ञानाच्या राष्ट्रीय परिषदेचे आयोजन यानिमित्ताने करण्यात आले होते. ग्रामीण, शहरी आणि आदिवासी विभागातून देशभरातील २१ नवतंत्रज्ञ यात सहभागी झाले होते. ज्याप्रमाणे आपण देशाची वित्तीय तूट बघतो, त्या प्रमाणे नवतंत्रज्ञानाची तूट सुद्धा बघायला हवी. देशाच्या दृष्टीने महत्वपूर्ण असलेल्या या गोष्टीची दखल अंजनी माशेलकर पुरस्काराने घेतली असल्याचे डॉ.केळकर म्हणाले.

पुणेकरांनो, उद्यापासून वाहतूकीत होणार 'हे' बदल कारण... 

"महिन्याला ४-५ लोक मैला साफ करताना मृत्युमुखी पडल्याचे आम्ही वाचले. तेंव्हाच आम्ही ठरवले की आम्ही जे काही तंत्रज्ञान विकसित करू ते आजच्या गंभीर समस्यांवर चांगला उपाय ठरेल. यातूनच बेंडीकूट  जन्माला आला. यामुळे सफाई कामगाराला गटारीत उतरून काम करण्याची गरज नाही. बाहेर उभे राहून तो रोबोचे संचालन करेल."
- विमल रशीद, शोधकर्ता.

महिला चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार घुसली टॉयशॉपमध्ये; एका महिलेचा मृत्यू   

'बेंडीकूट'ची वैशिष्ट्ये
- गटारीत जाऊन मैला साफ करणारा जगातला पहिला रोबो
- दुर्गम आणि खोलवरच्या गटारीत मैला सफाईसाठी सक्षम
- इन्फ्रारेड केमेरा, स्वयंचलित हात आदी उपकरणांनी पूर्ण
- एका दिवसाला दहा गटारी साफ करतो
- संचालकांची गरज असल्यामुळे कुणाचीही नोकरी जाणार नाही
- रिमोटद्वारे संचालन
- पाणी आणि ज्वलनशील मिथेन वायूचा कोणताही धोका नाही

राष्ट्रवादी 'कोअर कमिटी'ची आज पुण्यामध्ये बैठक 

'बेंडीकूट'चे प्रत्यक्ष कार्यान्वयन
- केरळसह सहा राज्यात प्रत्यक्ष काम चालू
- पुढील चार महिन्यात १०० रोबोचे आवश्यकता
- दुबई महापालिकेसोबत करार
- मोठ्या प्रमाणावर उत्पादनासाठी ब्राबो रोबोटिक्स सोबत करार. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com