अंकिता पाटील यांचा मताधिक्‍याचा विक्रम

Ankita-Patil
Ankita-Patil

पुणे - पुणे जिल्हा परिषदेवर सर्वाधिक मताधिक्‍याने निवडून येण्याबाबतचा राष्ट्रवादी काँग्रेसचे बारामती तालुका अध्यक्ष संभाजी होळकर यांच्या नावावर असलेला विक्रम अंकिता पाटील यांनी मोडला. सर्वाधिक मताधिक्‍याने निवडून येण्याचा नवा विक्रम त्यांच्या नावावर नोंदला गेला आहे. 

जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती संभाजी होळकर हे २०१२ मध्ये झालेल्या  निवडणुकीत बारामती तालुक्‍यातील वडगाव- सांगवी जिल्हा परिषद गटातून सर्वाधिक १६ हजार मताधिक्‍य घेत निवडून आले होते. होळकर यांनी त्यांच्या आधी असलेला ११ हजार मताधिक्‍यांचा विक्रम मोडीत काढला होता. होळकर यांच्या नावावर पुढे सात वर्षे हा विक्रम कायम राहिला होता. तो आज अंकिता पाटील यांनी मोडीत काढला. त्या १७ हजार २७४ मताधिक्‍यांनी विजयी झाल्या आहेत. जिल्हा परिषदेचा प्रत्येक मतदारसंघ हा सरासरी ४० हजार मतदारांचा असतो. त्यातच कमाल ६० ते ६५ टक्के इतके मतदान होत असते.

त्यामुळे जिल्हा परिषदेवर निवडून येणाऱ्या सदस्यांचा विजय हा काही हजारांपुरताच मर्यादित राहत असतो. त्यामुळे कमाल दहा हजारांहून अधिक मताधिक्‍य घेत विजयी होणाऱ्यांचे प्रमाण अगदी नगण्य असते. आतापर्यंत दहा हजारांहून अधिक मताधिक्‍य घेतलेल्यांत जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदीप कंद यांच्यासह केवळ पाच जणांचा समावेश आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com