अंकिता पाटील यांचा विजय

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 25 जून 2019

इंदापूर तालुक्‍यातील बावडा- लाखेवाडी जिल्हा परिषद गटाच्या पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवार अंकिता हर्षवर्धन पाटील यांनी एकतर्फी मोठा विजय मिळविला. त्यांना १७ हजार २७४ एवढे मोठे विक्रमी मताधिक्‍य मिळाले आहे. बावडा- लाखेवाडी जिल्हा परिषद गटाच्या सदस्या व माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या मातोश्री रत्नप्रभादेवी पाटील यांच्या निधनामुळे या गटाची पोटनिवडणूक घेण्यात आली. त्यात काँग्रेसने हर्षवर्धन पाटील यांच्या कन्या अंकिता यांना उमेदवारी दिली होती.

बावडा - इंदापूर तालुक्‍यातील बावडा- लाखेवाडी जिल्हा परिषद गटाच्या पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवार अंकिता हर्षवर्धन पाटील यांनी एकतर्फी मोठा विजय मिळविला. त्यांना १७ हजार २७४ एवढे मोठे विक्रमी मताधिक्‍य मिळाले आहे. बावडा- लाखेवाडी जिल्हा परिषद गटाच्या सदस्या व माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या मातोश्री रत्नप्रभादेवी पाटील यांच्या निधनामुळे या गटाची पोटनिवडणूक घेण्यात आली. त्यात काँग्रेसने हर्षवर्धन पाटील यांच्या कन्या अंकिता यांना उमेदवारी दिली होती. 

तसेच, सात अपक्ष उमेदवार रिंगणात होते. अंकिता पाटील यांना राष्ट्रवादी काँग्रेस व मित्रपक्षांनी पाठिंबा दिला होता. तसेच, या निवडणुकीत इतर राजकीय पक्षांनी उमेदवार दिलेले नव्हते. एकूण २५ हजार ७४० एवढे मतदान रविवारी (ता. २३) झाले. मतमोजणी आज (ता. २४) इंदापूर येथे झाली. त्यात अंकिता पाटील यांना २० हजार ७३७ मते मिळाली; तर अपक्ष उमेदवार दीपाली कोकाटे यांना ३ हजार ४६३ मते मिळाली. निवडणूक निकालानंतर बावडा- लाखेवाडी गटातील गावागावांमध्ये कार्यकर्त्यांनी फटाके फोडून विजयोत्सव साजरा केला.

अंकिता पाटील यांनी, जिल्हा परिषदेच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेचे आरोग्य, शिक्षण, रस्ते व युवा पिढीचे प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न राहील, असे विजयानंतर सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ankita Patil Win in Bawada Lakhewadi ZP Election Politics