
Baramati News : बारामतीत येऊन पवारांचे बारा वाजून दाखवाच अंकुश काकडे यांचे नारायण राणे यांना आव्हान
बारामती : नारायणराव राणे आपण बारामतीत येऊन अजित पवार यांचे बारा वाजून दाखवा…. असे प्रति आव्हान पुण्यातील राष्ट्रवादीचे नेते अंकुश काकडे यांनी दिले आहे. या संदर्भात अंकुश काकडे यांनी एक व्हिडिओ क्लिप जारी करून नारायण राणे यांचे आव्हान राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्वीकारत आहे.
तुम्ही बारामतीत येऊन अजित पवार यांचे बारा वाजून दाखवा, राष्ट्रवादीचे कार्यकर्ते, युवक, महिला तुमचे बारामतीत स्वागत करण्यास उत्सुक असतील, असे सांगण्यासही अंकुश काकडे या क्लिपमध्ये विसरलेले नाहीत.
अजित पवार यांनी नारायण राणे यांची पुण्यातील निवडणुकीच्या प्रचार सभेमध्ये खिल्ली उडवली होती. यानंतर नारायण राणे यांनी देखील अजित पवार यांना आव्हान देत मी पुण्यात, बारामतीत येऊन तुमचे बारा वाजविन असा इशारा दिला होता.
नारायण राणे यांच्या इशाऱ्या नंतर राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांच्या या इशाऱ्याची देखील खिल्ली उडवली हे आता स्पष्ट झाले आहे. अंकुश काकडे यांनी थेट नारायण राणे यांचे आव्हान आम्ही स्वीकारत असून त्यांनी बारामतीत येऊन बारा वाजून दाखवावेत, असे प्रति आव्हान दिल्याने आता हा मुद्दा अधिक पेटणार अशीच चिन्ह दिसत आहेत.
नारायण राणे यांना चिमटा काढताना अंकुश काकडे यांनी ज्या शिवसेनेने तुम्हाला मोठे केले, मुख्यमंत्रीपद दिलं, त्या शिवसेनेला सोडून आता तुम्ही भाजपसोबत गेला आहात, अशा शब्दात त्यांच्यावर टीकास्त्र सोडले. अंकुश काकडे यांच्या या क्लिप नंतर आता पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस याबाबत आक्रमक होणार अशी चिन्हे दिसत आहेत.