अण्णा भाऊ साठे यांना जयंतीनिमित्त अभिवादन

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 2 ऑगस्ट 2019

पुणे - लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांची जयंती शहरात विविध कार्यक्रमांनी साजरी करण्यात आली. सारसबागेजवळ असलेल्या अण्णा भाऊंच्या पुतळ्याला विविध संघटना व संस्थांच्या वतीने पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. 

मानव एकता विकास फाउंडेशन, झोपडपट्टी सुरक्षा दल, लष्कर ए भिमा, विलास चौरे समाजसेवा प्रतिष्ठान, रिपब्लिकन मातंग सेना, राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताडीवाला रोड विभाग, दलित महासंघ, दलित पॅंथर, क्रांतिगुरू लहुजी महासंघ, दलित पॅंथर इंडिया, विश्‍व वाल्मिकी सेना आणि रिपब्लिकन संघर्ष दलाच्या वतीने अण्णा भाऊंच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. 

विश्‍व वाल्मिकी सेनेच्या वतीने पुणे स्टेशन परिसरात गरजूंना अन्नदान करण्यात आले. शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनेही शहर कार्यालयात अण्णा भाऊंच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. या वेळी चेतन तुपे, वैजनाथ वाघमारेे उपस्थित होते. पुणे नवनिर्माण सेवा संघाच्या वतीने विद्यार्थ्यांना चरित्र ग्रंथाचे वाटप करण्यात आले. अजय पैठणकर, अरुण गुजर उपस्थित होते.

‘साठे यांना ‘भारतरत्न’ द्यावे’
लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त विविध संघटनांनी त्यांना ‘भारतरत्न’ द्यावे, अशी मागणी केली आहे. यामध्ये भीम आर्मी या संघटनांचा समावेश आहे. रामदास सूर्यवंशी यांनी अण्णा भाऊंच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला. कार्यक्रमाला राजेंद्र पंडित, शैलेश बडदे, राजेश भोसले उपस्थित होते. भीम आर्मी बहुजन एकता मिशनच्या वतीने प्रदेशाध्यक्ष पोळ यांच्या हस्ते अण्णा भाऊंच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. या वेळी नीता अडसुळ उपस्थित होत्या.

साठे, टिळक यांना अभिवादन
पुणे जिल्हा ग्राहक संरक्षण समितीच्या वतीने लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त आणि लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना अभिवादन करण्यात आले. समितीच्या वतीने सारसबागे समोरील अण्णा भाऊंच्या आणि महात्मा फुले मंडईतील लोकमान्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. या वेळी संजय मोरे, हसमत बागवान, फैयाज शेख, सुरेखा भोसले आदी उपस्थित होते. तसेच प्रियदर्शनी शिक्षण संस्था आणि रिपब्लिकन जनशक्ती यांच्या वतीनेही या महापुरुषांना आदरांजली वाहण्यात आली.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: anna bhau sathe jayanti