अण्णासाहेब मगर महाविद्यालयाचा पदवीग्रहण समारंभ संपन्न

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 18 मार्च 2018

पुणे जिल्हा शिक्षण मंडळ संचलित सर्व महाविद्यालयांचा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पदवीग्रहण समारंभ नुकताच झाला.

मांजरी - 'उच्च शिक्षणातील संधी, विज्ञान आणि युवकांमधील क्षमतांचा समन्वय साधल्यास आपल्या देशात अनेक संशोधकांसह कार्यक्षम व कुशल मनुष्यबळाची निर्मिती होईल. त्यासाठी रोजगाराभिमुख शिक्षण व अभ्यासक्रम निर्मितीवर भर दिला पाहिजे.' असे प्रतिपादन नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पंडित विद्यासागर यांनी केले.
       
पुणे जिल्हा शिक्षण मंडळ संचलित सर्व महाविद्यालयांचा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पदवीग्रहण समारंभ नुकताच झाला. त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. विद्यासागर बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे मानद सचिव अॅड. संदीप कदम होते. खजिनदार मोहनराव देशमुख, उपसचिव एल. एम. पवार, सहसचिव ए. एम जाधव, उपप्राचार्य डॉ. भाऊसाहेब बेंद्रे, महाविद्यालयीन परीक्षा अधिकारी प्रा. उल्हास लंगोटे, शिवाजी सोनवणे, ललित सिंग आदी यावेळी उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष मानद सचिव अॅड. संदीप कदम यांनीही या वेळी स्नातकांना मार्गदर्शन केले. या प्रसंगी डॉ. पंडित विद्यासागर यांच्या हस्ते अण्णासाहेब मगर महाविद्यालयातील सुधाकर गायकवाड, मंगला पाडवी, श्रद्धा काळे, सुवर्णा काळे, राहुल बरबडे, काजल जरांडे, गौरी सदंबर, पल्लवी पारवे, प्रगती बदादे, पूनम वर्मा या स्नातकांना याप्रसंगी पदवीप्रदान करण्यात आली. महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. शर्मिला चौधरी, उपप्राचार्य डॉ. भाऊसाहेब बेंद्रे, डॉ. आनंद महाजन यांनी या विद्यार्थ्यांचे अभिनंदन  केले.
 

 

Web Title: Annasaheb magar college manjari pune convocation ceremony