अण्णासाहेब मगर पुण्यतिथी

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 25 जून 2018

शेतकरी, कामगार यांच्याबद्दल अण्णासाहेब यांना जिव्हाळा होता. कृषी तसेच औद्योगिक क्षेत्रात भरीव कामगिरी केली. बहुजन समाजाला शिक्षित करण्यासाठी ते झटले.

मांजरी - 'अण्णासाहेब मगर यांनी सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, शैक्षणिक, सहकार क्षेत्रात भरीव कामगिरी करत पुणे जिल्ह्याच्या विकासाची पायाभरणी केली. त्यांनी दुरदृष्टीने पायाभूत सुविधा निर्माण केल्या. शेतकरी, कामगार यांच्याबद्दल अण्णासाहेब यांना जिव्हाळा होता. कृषी तसेच औद्योगिक क्षेत्रात भरीव कामगिरी केली. बहुजन समाजाला शिक्षित करण्यासाठी ते झटले. त्यांना पुणे जिल्हयाचे शिल्पकार म्हटले तरी वावगे ठरणार नाही.' असे प्रतिपादन माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर यांनी केले.

येथील अण्णासाहेब मगर महाविद्यालयात अण्णासाहेब मगर यांच्या पुण्यतिथि निमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी शिवरकर बोलत होते. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शर्मिला चौधरी यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. 

याप्रसंगी माजी उपमहापौर निलेश मगर, नगरसेविका हेमलता मगर, नगरसेवक मारुती तुपे, नगरसेविका पूजा कोद्रे, माजी प्राचार्य महादेव वाल्हेर, पिराजी मगर, लहू मगर, बाळासाहेब मगर, उपप्राचार्य डॉ. भाऊसाहेब बेंद्रे, डॉ. आनंद महाजन, प्रा. अनिल जगताप, प्रा.शोभावती महाजन आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा. नितीन लगड यांनी केले तर आभार डॉ. भाऊसाहेब बेंद्रे यांनी मानले.

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

 

Web Title: Annasaheb magar death anniversary at manjari pune