इंदापूरात आणखी 10 कोरोनाबाधित आढळले; एकुण रुग्णांचा आकडा पोहचला..

डॉ. संदेश शहा
रविवार, 2 ऑगस्ट 2020

इंदापूर तालुक्यातील भिगवण मध्ये ४ जण तर, भिगवण नजीक म्हसोबाची वाडी येथे 2 जण कोरोनाबाधित असल्याचे कोरोना चाचणी अहवालाअंती स्पष्ट झाल्याने भिगवण हॉट स्पॉट बनल्याचे दिसून येत आहे. भिगवणमध्ये सातत्याने कोरोना रुग्ण आढळून येत असल्याने चिंतेचा विषय झाला आहे.

इंदापूर : इंदापूर शहर व तालुक्यात (ता. २) ऑगस्ट सकाळी १० कोरोना बाधित रुग्ण आढळून आल्याने तालुक्यातील आजपर्यंतच्या कोरोना रुग्णांची संख्या १९५ झाली असल्याची माहिती तहसीलदार सोनाली मेटकरी तसेच इंदापूर उपजिल्हा रुग्णालयाचे प्रभारी वैद्यकीय अधीक्षक डॉ.एकनाथ चंदनशिवे यांनी दिली.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

इंदापूर तालुक्यातील भिगवण मध्ये ४ जण तर, भिगवण नजीक म्हसोबाची वाडी येथे 2 जण कोरोनाबाधित असल्याचे कोरोना चाचणी अहवालाअंती स्पष्ट झाल्याने भिगवण हॉट स्पॉट बनल्याचे दिसून येत आहे. भिगवणमध्ये सातत्याने कोरोना रुग्ण आढळून येत असल्याने चिंतेचा विषय झाला आहे.

डिप्लोमाच्या प्रवेशाला मुहूर्त सापडेना; वेळापत्रकाकडे लागले विद्यार्थ्यांचे लक्ष!

इंदापूर शहरात दोन तर निमगाव केतकी व कळाशी येथे प्रत्येकी एक असे एकूण 10 रुग्ण आढळून आल्याने इंदापूर तालुक्याची दोनशे कडे वाटचाल सुरू झाली आहे. भिगवण, म्हसोबाची वाडी, निमगाव केतकी, कळाशी तसेच इंदापूर शहरमध्ये कंटेन्मेंट झोनची अंमलबजावणी करण्यात आल्याची माहिती गटविकास अधिकारी विजयकुमार परीट व नगरपरिषद मुख्याधिकारी डॉ. प्रदिप ठेंगल यांनी दिली.

दरम्यान,'' कोरोना संसर्गावर मात करता येते. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जावू नये मात्रशासन निर्देशांचे सर्वांनी पालन करावे'', असे आवाहन सामान्य प्रशासन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केले आहे. 

इंदापूर कॉलेज झालं डिजिटल; विद्यापीठाचे ऑनलाईन प्लॅटफॉर्मचा सगळ्यांत पहिला उपयोग


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Another 10 corona positive were found in Indapur