चाकण हिंसाचार प्रकरणी आणखी 11 आंदोलक अटकेत

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 5 डिसेंबर 2018

चाकण  :   चाकण हिंसाचार प्रकरणी प्रकरणी आणखी अकरा आंदोलकांना अटक करण्यात आली आहे. 'एसआयटी' स्थापन केल्यानंतर या आठवड्यात पुन्हा धरपकड सुरू झाली आहे. पोलिसांनी पुन्हा एकदा कारवाईचा धडाका लावल्याने अनेकांचे धाबे दणाणले आहे. आधीचे 30 आणि आत्ताचे 11 असे एकूण 41 आंदोलकांना आत्ता पर्यंत अटकेत आहेत.

सकाळचे मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करा

गतवर्षी 30 जुलैला पुणे-नाशिक महामार्गावरील तळेगाव चौकात हे हिंसक आंदोलन झाले होते. तेंव्हा हा भाग पुणे ग्रामीण पोलिसांच्या हद्दीत होता. त्यावेळी पुणे ग्रामीण पोलिसांनी 30 आंदोलकांना अटक केली होती. आता हा भाग नव्याने स्थापन झालेल्या पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयात वर्ग करण्यात आला आहे. पोलीस आयुक्त आर के पद्मनाभन यांनी या तपासासाठी एसआयटी स्थापित केली. त्यांनी या आठवड्यात कारवाईचं सत्र सुरू करत अकरा आंदोलकांना अटक केली आहे. 

Web Title: Another 11 protesters detained in Chakan violence case