'राष्ट्रवादी'त प्रवेश करण्यासाठी कलाकारांची रांग; आता 'हे' कलाकार करणार प्रवेश!

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 16 July 2020

ज्येष्ठ नेते आणि पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी कलाकारांच्या समस्या सोडविण्यासाठी नेहमीच पुढाकार घेतला आहे. त्यामुळे या पक्षाबद्दल आम्हाला आपुलकी आहे. 

पुणे : लावणी नृत्यांगणा आणि अभिनेत्री माया जाधव, अभिनेत्री प्रेमा किरण आणि अभिनेते बाळकृष्ण शिंदे यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. पक्षाच्या सांस्कृतिक विभागात या अभिनेत्री-अभिनेते कार्यरत राहणार असल्याचे 'सकाळ'शी बोलताना त्यांनी सांगितले. प्रिया बेर्डे यांच्यासह मराठी चित्रपटसृष्टीतील 7 कलाकारांनी पक्षात नुकताच प्रवेश केला आहे. 

HSC Result 2020 : पुण्याने नाही, तर 'या' जिल्ह्याने मारली बाजी; पाहा सविस्तर निकाल!​

Image may contain: 1 person, hat

मराठी चित्रपटसृष्टीत जाधव यांनी सुमारे 40 वर्षे काम केले आहे. सुमारे 70 हून अधिक चित्रपटांत त्यांनी रोल केले आहेत. तसेच लावणी प्रकारातही पारंगत म्हणून त्यांची ओळख आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश करण्यामागची भूमिका स्पष्ट करताना त्या म्हणाल्या, चित्रपटसृष्टीत प्रदीर्घ काळ काम केल्यामुळे कलावंतांच्याही काही समस्या असतात, हे दिसून आले. नव्या आणि जुन्या कलाकारांनाही त्या समस्यांना सामोरे जावे लागते. त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी राजकीय व्यासपीठ गरजेचे आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस त्यासाठी उपयुक्त आहे. आम्ही आमचे क्षेत्र न सोडताही पक्षाच्या माध्यमातून काम करू शकतो. ज्येष्ठ नेते आणि पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी कलाकारांच्या समस्या सोडविण्यासाठी नेहमीच पुढाकार घेतला आहे. त्यामुळे या पक्षाबद्दल आम्हाला आपुलकी आहे. 

इकडं जामीन मंजूर झाला, अन् तिकडं त्याला कोरोना झाला!​

Image may contain: 1 person

प्रेमा किरण यांनीही पक्षाचे नेते शरद पवार, छगन भुजबळ, अजित पवार, सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्त्वावर विश्वास असल्याचे सांगितले. नव्या कलाकारांना दूरचित्रवाणी मालिकांचे पैसे तीन महिने मिळत नाहीत, तसेच चित्रपटांचेही पैसे वेळेवर मिळत नाही. तसेच पडद्यामागच्या कलाकारांना तर कोणीही वाली नसतो. त्याच्यासाठी आता काम करण्याची इच्छा आहे. महामंडळ असले तरी, त्याला मर्यादा आहेत. त्यामुळे राजकीय पक्षाच्या माध्यमातून त्यासाठी पुढाकार घेण्याचे ठरविले आहे, असे प्रेमा किरण यांनी सांगितले. 

'या' डॉक्टरांचा सल्ला ऐकाल, तर तुम्हीही व्हाल कोरोनामुक्त

Image may contain: 1 person, beard and outdoor

सावरखेड एक गाव, एक होती वादी, धुडगूस, पोलिस लाईन, प्रेमाचा गेम सेम टू सेम, झाला बोभाटा आदी चिपत्रटांत काम केलेले आणि सध्या दूरचित्रवाणी वाहिनीवरील तुझ्यात जीव रंगलामध्ये अभिनेते म्हणून काम करणारे बाळकृष्ण शिंदे यांनीही राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या सांस्कृतिक विभागात काम करण्याची इच्छा व्यक्त केली असून त्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये काम करणार असल्याचे सांगितले आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

मराठी चित्रपटसृष्टीतील तसेच नाट्यसृष्टीतील अनेक कलावंतांनी पक्षात प्रवेश करण्याचे ठरविले आहे. त्या बाबत काही कलाकारांशी चर्चाही सुरू आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, नेते अजित पवार, सुप्रिया सुळे यांच्याशी चर्चा करून अभिनेते, अभिनेत्री यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरविण्यात येईल, अशी माहिती राष्ट्रवादी चित्रपट-सांस्कृतिक विभागाचे प्रदेश कार्याध्यक्ष बाबा पाटील यांनी दिली. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

(Edited by : Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Another 3 actresses and actors will now also join the Nationalist Congress Party