esakal | बारामतीतील भविष्य सांगणाऱ्याचा कोरोनाने मृत्यू 
sakal

बोलून बातमी शोधा

dead_bod

या रुग्णाच्या मृत्यूमुळे बारामती परिसरात चिंतेचे वातावरण पसरले आहे. बारामती शहरातील कोरोनाचा हा दुसरा, तर ग्रामीण भागातील चौथा मृत्यू आहे.

बारामतीतील भविष्य सांगणाऱ्याचा कोरोनाने मृत्यू 

sakal_logo
By
मिलिंद संगई

बारामती (पुणे) : बारामती शहरातील रुई येथील कोरोना केअर सेंटरमध्ये उपाचर घेत असलेल्या जळोची येथील एका 50 वर्षांच्या प्रौढाचा आज कोरोनामुळे मृत्यू झाला. भविष्य सांगण्याचा व्यवसाय ते करीत होते, अशी माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली.  

मुंबईकर जावयाने उडवली दौंडजकरांची झोप

या व्यक्तीला काल संध्याकाळी त्रास होत होता. त्यामुळे त्यांना रुई येथील दवाखान्यात दाखल केले होते. त्यांच्यावर उपचारही सुरु करण्यात आले होते. त्यांच्या घशातील द्रावाचा नमुना काल तपासणीसाठी पाठविण्यात आला होता. मात्र, त्याचा अहवाल येण्याअगोदरच त्यांचा पहाटे मृत्यू झाला. दरम्यान, आज दुपारी त्यांचा अहवाल पॉझिटीव्ह आला असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी मनोज खोमणे यांनी दिली. 

सोरतापवाडीत तलाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात

संबंधित प्रौढ व्यक्तीस दम लागणे, खोकला, अशक्तपणा अशी लक्षणे होती. मंगळवारी दुपारी तीन वाजता सदर व्यक्ती रुई येथील केंद्रात दाखल झाली होती. पहाटे अडीचच्या दरम्यान व्हेंटीलेटरवर असताना त्यांचा मृत्यू झाला. त्यांची प्रकृती झपाट्याने खालावत गेली. त्यांना पुण्याला हलविण्याची तयारीही केली होती, मात्र, त्या अगोदरच त्यांचा पहाटे मृत्यू झाला. 

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
 
या रुग्णाच्या मृत्यूमुळे बारामती परिसरात चिंतेचे वातावरण पसरले आहे. बारामती शहरातील कोरोनाचा हा दुसरा, तर ग्रामीण भागातील चौथा मृत्यू आहे. त्यामुळे सर्वांनी मास्क व सॅनेटायझर्सचा वापर करावा, गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळणे, सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे, अशा बाबी पाळाव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे.