पुण्यात गोळीबाराची दुसरी घटना ; एक जखमी

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 21 नोव्हेंबर 2018

पुणे :  वडगावशेरी येथे गोळीबाराची घटना ताजी असतानाच कोंढव्याजवळील येवलेवाडी येथे दुपारी दोनच्या सुमारास गोळीबाराची घटना घडली. या गोळीबारात सराफा दुकानातील कामगार जखमी गंभीर जखमी असून त्याला रूणालयात दाखल करण्यात आले आहे.
 
अमृत परिहार (वय 27) हा गोळीबारात जखमी झाला आहे. येवलेवाडी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेजवळ श्रीगणेश ज्वेलर्सच्या दुकानात तो कामास आहे. दुचाकींवर आलेल्या चार हल्ल्लेखोरांनी गोळीबार केला. हल्लेखोरांनी तोंडाला रूमाल बांधलेला होता. हल्लेखोर येवलेवाडीच्या मागच्या बाजूने पसार झाले.  पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत.

सकाळचे मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करा

एकाच दिवशी गोळीबाराची दुसरी घटना
वडगावशेरी येथील आनंद पार्क परिसरात झालेल्या गोळीबारात एका महिलेचा मृत्यू झाला. ही घटना सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडालेली असताना पुण्यात गोळीबाराची दुसरी घटना घडली. 

Web Title: Another incident of firing in Pune; One injured