शिरूरमध्ये वाढला कोरोनाचा वेग, या गावांमध्ये सापडले रुग्ण  

corona
corona

शिरूर (पुणे) : शिरूर तालुक्यात कोरोनाबाधितांचा वेग वाढत चालला असून, आज दिवसभरात नऊ जणांचे रिपोर्ट पाॅझिटिव्ह आले. त्यातील पाच कामगार आहेत. तालुक्यातील एकूण बाधितांचा आकडा 74 झाला असून, आतापर्यंत 38 जण ठणठणीत झाले आहेत. 

आज शिरूर शहरापासून जवळच असलेल्या रामलिंग रोडवरील जाधव मळ्यातील दोघांचे कोरोना रिपोर्ट पाॅझिटिव्ह आले असून, ते काही दिवसांपूर्वी चेन्नईहून येथे आले होते. आल्यापासून त्यांना क्वारंटाइन करण्यात आल्याने पुढील प्रादुर्भाव टळण्याची शक्यता आहे.  

आज दिवसभरात रांजणगाव गणपती, शिक्रापूर, कोरेगाव भीमा येथील प्रत्येकी एका कामगाराचा रिपोर्ट पाॅझिटिव्ह आला आहे. हे तिघेही रांजणगाव एमआयडीसीतील विविध कंपन्यात कामाला होते. गणेगाव खालसा येथील दोघांचा रिपोर्ट पाॅझिटिव्ह आला असून, ते पिंपळे जगताप येथील बाधित आडतदारांच्या संपर्कात आले होते, असे तालुका आरोग्य अधिकारी डाॅ. आर. डी. शिंदे यांनी सांगितले. 

पुण्याच्या बातम्यांसाठी येथे क्लिक करा

शिरूर तालुक्यातील गावनिहाय कोरोनाबाधितांची आजअखेरची संख्या पुढीलप्रमाणे : शिक्रापूर : सतरा, विठ्ठलवाडी- १, सणसवाडी- १, तळेगाव ढमढेरे- ५ , शिवतक्रार म्हाळुंगी- २, कोरेगाव भीमा- ३, निमगाव म्हाळुंगी- १, गणेगाव खालसा- ३, दहिवडी- १, रांजणगाव गणपती- ५, करंजावणे- १ , मांडवगण फराटा- १, कुरुळी- २, न्हावरे- २, निमोणे- १, टाकळी हाजी- २ , कारेगाव- १, अण्णापूर- १, तर्डोबाचीवाडी– ३, शिरुर ग्रामीण– ५, कवठे येमाई- ५, केंदूर- १,  पाबळ- १, जातेगाव बुद्रुक- १, शिरूर शहर- ५. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com