शिवाजीनगरमध्ये जाहिरात फलकासाठी आणखी एका वृक्षाचा बळी

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 4 फेब्रुवारी 2020

शिवाजीनगर परिसरात पंधरवड्यात दूसऱ्यांदा असा प्रकार आढळून आला आहे. 
महापालिकेच्यावतीने स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत 'झाडे लावा; झाडे जगवा', 'स्वछ पुणे; हरित पुणे,'अशी जाहिरात करण्यात येत आहे. मात्र, दुसरीकडे दिवसाढवळ्या कोणाच्या तरी हितासाठी झाडांची कत्तल करण्यात येत आहे. शिवाजीनगर परिसरात महिन्याभरात झाडांची कत्तल करण्याची दुसरी घटना हस्तीमल फिरोदिया पुलाजवळील नाबार्ड बँकेच्याच्या शेजारी घडली आहे.

खडकी बाजार(पुणे) : पुणे महापालिकेकडून एकीकडे स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत शहरात वृक्षांचे संगोपन करण्याबाबत जनजागृती सुरू आहे. प्रत्यक्षात जाहिरात फलकांसाठी मोठ मोठ्या वृक्षांची कत्तल सुरू आहे. संचेती रूग्णालयाजवळील एक झाड जाहिरात फलकाला अडथळा ठरत असल्याने मंगळवारी पहाटे तोडण्यात आले. यासाठी महापालिकेची परवानगी घेण्यात आली नव्हती. उद्यानविभागाकडून याबाबत नोटीस देण्याशिवाय कोणतीही कारवाई होत नसल्याने वृक्षकत्तल करणाऱ्यांना अभय मिळत आहे. याबाबत पर्यावरणवाद्यांनी संताप व्यक्त केला आहे. 

Image may contain: sky, outdoor and nature
आजपासून तुझी उलटी गिनती सुरू कर, तुला अन् तुझ्या मुलाला मारुन टाकीन

शिवाजीनगर परिसरात पंधरवड्यात दूसऱ्यांदा असा प्रकार आढळून आला आहे. 
महापालिकेच्यावतीने स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत 'झाडे लावा; झाडे जगवा', 'स्वछ पुणे; हरित पुणे,'अशी जाहिरात करण्यात येत आहे. मात्र, दुसरीकडे दिवसाढवळ्या कोणाच्या तरी हितासाठी झाडांची कत्तल करण्यात येत आहे. शिवाजीनगर परिसरात महिन्याभरात झाडांची कत्तल करण्याची दुसरी घटना हस्तीमल फिरोदिया पुलाजवळील नाबार्ड बँकेच्याच्या शेजारी घडली आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांनी व पर्यावरणप्रेमींनी महापालिकेच्या अनागोंदी कारभाराबद्दल संताप व्यक्त केला आहे. झाडांची कत्तल करणाऱ्यांविरोधात कडक कारवाई करण्याची मागणी, नागरीकांनी केली आहे. 

पुणे : वडगाव शेरीत भरधाव दुचाकीच्या धडकेत पादचारी तरुणाचा मृत्यू 

संचेती हॉस्पिटलकडून अभियांत्रिकी महाविद्यालय चौकाकडे जाणाऱ्या फिरोदिया पुलाखाली नाबार्ड शेजारी मंगळवार (ता.4) पहाटे एका मोठ्या झाडाची कत्तल करण्यात आली असून पूर्ण झाड कापून टाकण्यात आले आहे. झाडाशेजारीच मोठ मोठे जाहीरात फलक आहेत. हे झाड त्या फलकासाठी अडथळा ठरत होते. झाडामुळे जाहिरात स्पष्ट दिसत नव्हती. कदाचित याच कारणासाठी या मोठ्या झाडाची बळी दिला गेला असल्याचे परिसरात बोलले जात आहे. 

तानाजी मालुसरेंच्या पुण्यतिथीला अजय देवगण सिंहगडावर येणार?
 

एकीकडे सरकार वृक्ष संगोपनासाठी कोट्यवधी रुपये खर्च करीत आहे. त्यासाठी विविध योजनाही राबविल्या जातात मात्र, काही लोकांकडून स्वतःच्या स्वार्थासाठी झाडांचा बळी घेण्याचे प्रकार सध्या सुरू आहेत. शिवाजीनगर परिसरात फलकांसाठी झाडांची कत्तल करण्याची पंधरवड्यातील ही दुसरी घटना घडली आहे. काही दिवसांपूर्वी पुणे मुंबई मार्गावरील अंडी उबवणी चौकातील दोन मोठी झाडे राहुरी विद्यापीठाच्या आवारात होर्डिंग लावण्यासाठी अडथळा ठरत असल्याने रात्रीतून कापून टाकण्यात आली होती. समाजकंटकांनी झाडे कापल्याचा पुरावा नष्ट करण्यासाठी झाडाचे खोडही मूळापासून काढून टाकून माती टाकुन पुरावा नष्ट केला होता. मात्र याबाबत "सकाळ' ने पूर्ण पाठपुरावा करून पुराव्यासह वृत्त प्रसिद्ध केले होते. येथील पर्यावरणप्रेमींनीही विषय लावून धरल्यामुळे जाहिरात फलक मालकाला महापालिकेच्या उद्यान विभागाने नोटीस बजावली होती. त्यानंतर ही दुसरी घटना घडल्यामुळे महापालिकेचे काही अधिकारी ही या प्रकरणात सहभागी असल्याची शंका येथील नागरिकांनी व्यक्त केली आहे. झाडे कत्तल करणाऱ्या व्यक्तीवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी परिसरातून होत आहे. 

भोसरीत जुन्या भांडणावरून एकावर भरदिवसा गोळीबार
 

'झाडांची कत्तल करणाऱ्यांचा शोध घेऊन त्या व्यक्तीवर महापालिकेच्या वनविभागाकडून कडक कारवाई करण्यात येईल. 
-धनंजय सोनवणे-वनविभाग अधिकारी,घोलेरोड क्षेत्रीय कार्यालय. 

पीएमपी बससेवेचा मोठा निर्णय


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Another tree victim for advertisement board in Shivaji Nagar