अंथुर्णेमध्ये हनुमानाच्या यात्रेनिमित्त कुस्त्याचा आखाडा

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 1 एप्रिल 2018

वालचंदनगर- अंथुर्णे (ता.इंदापूर ) येथील ग्रामदैवत हनुमानाची यात्रा  उत्साहात पार पडली. यात्रेनिमित्त जंगी कुस्त्यांच्या आखाड्याचे आयोजन करण्यात आले होेते.

वालचंदनगर- अंथुर्णे (ता.इंदापूर ) येथील ग्रामदैवत हनुमानाची यात्रा  उत्साहात पार पडली. यात्रेनिमित्त जंगी कुस्त्यांच्या आखाड्याचे आयोजन करण्यात आले होेते.

येथे प्रत्येक वर्षी  हनुमान जयंती निमित्ताने  विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. यावर्षी  गावातील महादेव मंदिरासमोर अखंड हरीनाम सप्ताहाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. शुक्रवार (ता.३०) रोजी  काल्याच्या कीर्तनाने  दुपारी हरीनाम सप्ताहाची सांगता करण्यात आली. सायंकाळी गावातील शंभू महादेवाच्या भक्तांनी गावात कावडी नाचवून महादेवाला कावडीच्या पाण्याचा अभिषेक घातला. शनिवार (ता.३१)  रोजी पहाटे हनुमान जन्मोत्सव साजरा करण्यात आला. सायंकाळी पाच नंतर  जंगी कुस्त्यांचे मैदानाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.  आखाड्यात सुमारे शंभर कुस्त्या पार पडल्या. सोलापूर,सातारा व नगर जिल्ह्यातील पहिलवान कुस्त्यांसाठी आले होते.  आदित्य अंकुश साबळे या छोट्या पहिलवानाच्या  कुस्तीने प्रेक्षकांचे मन जिंकली. यावेळी आबासाहेब भरणे, यात्रा कमिटीचे विजय शिंदे,कैलास साबळे,भरणेवाडीचे उपसरपंच गुलाब म्हस्के ,माजी सरपंच राहुल साबळे,तानाजी शिंदे, छत्रपतीचे माजी संचालक बाळासाहेब शिंदे, तंटामुक्त अध्यक्ष दत्तात्रेय गायकवाड, विशाल साबळे, बाळासाहेब वाघ, श्रीमंत बरळ उपस्थित होते.

Web Title: anthurne village hanuman jayanti festival