anushka-kumbhar
anushka-kumbhar

अनुष्काची आजारावर मात; मनाला कोरोना होऊ नाही दिला

पुणे - ‘अनलॉक’ची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर दूध, भाजीपाला अन्‌ केक बनवायचे साहित्य आणण्यासाठी मी बाहेर पडू लागले. पण, दोन दिवसांनीच ताप आला अन कोरोना झाल्याचा अहवाल आला. हे ऐकून सर्वांनाच धक्का बसला; पण मी मनाला कोरोनाची लागण होऊ दिली नाही. बरे होऊनच घरी येणार, असा सकारात्मक विचार केला अन चार दिवसांत कोरोनावर यशस्वी मातही केली. आता मी प्लाझ्माही दान करणार आहे... सांगत होती वाघोली येथील भाडळे वस्तीमधील अनुष्का शशिकांत कुंभार. लॉकडाउनमुळे आमच्या ११ जणांच्या कुटुंबीयांनी घरात सर्वांना ‘लॉक’ करून घेतलं. ज्यावेळी अनलॉकची प्रक्रिया सुरू झाली, त्यानंतर वडील व काका नोकरी-व्यवसायानिमित्त बाहेर पडू लागले. मीही दूध, भाजीपाला आणण्यासाठी घराबाहेर पडत होते. ७ जूनला नातेवाइकांकडे जेवण केलं. ९ जूनला दाढ दुखत असल्याने गोळी घेतली. त्यातच तापही आला. १३ जूनला वडगाव शेरीत केकचे साहित्य आणण्यासाठी दुकानात गेले. दरम्यान, १६ जूनला ताप, सर्दी, खोकल्याचा त्रास सुरू झाला. घसाही ‘पॅक’ झाला. त्यामुळे सरकारी दवाखान्यातून गोळ्या घेतल्या. मात्र, २० जूनला सकाळी पाणीही गिळता येत नव्हतं. त्यामुळे पुन्हा डॉक्‍टरांकडे गेले अन औषधं घेतली. मात्र, फरक काही पडेना. त्यामुळे डॉक्‍टरांनी मला कुटुंबीयांच्या सुरक्षिततेसाठी कोरोनाची टेस्ट करण्याचा सल्ला दिल्याचं अनुष्कानं सांगितलं. 

चार दिवसात झाली बरे
कोरोनावर यशस्वीपणे मात करू, अशी खात्री होती. त्यानुसार स्वतःच खच्चीकरणं होऊ दिलं नाही. शरीराला कोरोना झाला; पण मनाला होऊ दिला नाही.. त्यामुळेच मी चार दिवसात बरी झाले. त्यानंतर सहा दिवस रुग्णालयात राहिले अन दहाव्या दिवशी घरी सोडण्यात आलं. त्यानंतर मी घरीही सात दिवस क्वॉरंटाइन राहिल्याचं अनुष्काने सांगितलं. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

काय केले उपाय...
मनाने न खचता सकारात्मक विचार ठेवले 
हळद-दूध पिऊन पाण्याची वाफ घेणे 
दोन वेळा आर्युेवेदिक काढा
व्हिटॅमिन सी व व्हिटॅमिन डी-थ्रीच्या गोळ्या

अशी केली मात...
‘‘कोरोनाच्या टेस्टसाठी मी वाघोलीतील भारतीय जैन संघटनेच्या कोविड सेंटरमध्ये २० जूनला गेले. मात्र, ते बंद असल्याने २२ जूनला वडिलांबरोबर पुन्हा जाऊन तपासणी केली. त्याचदिवशी रात्री माझा रिपोर्ट पॉझिटीव्ह असल्याचा फोन वडिलांना आला. त्यामुळे २३ जूनला सकाळी उठल्या उठल्याच वडिलांनी कोरोना झाल्याचं सांगताच सर्वांच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. वडिलांनी सांगितलं की, ‘काळजी करू नको; आता जायचं अन बरं होऊन यायचं.’ त्यामुळे धीर मिळाला. केसनंद फाट्याजवळील आयुर्वेद हॉस्पिटलमध्ये सकाळी दाखल झाले. तेथे प्राथमिक तपासणी झाल्यानंतर आर्युेवेदिक उपचार सुरू केले,’’ असे अनुष्कानं सांगितले. दरम्यान, डॉक्‍टरांनी मला काढा दिला. आयुर्वेदासह ॲलोपॅथीच्या गोळ्याही सुरू होत्या. तरीही ताप, थंडी वाजत होती. नातेवाईक, मित्र-मैत्रिणींचे फोनही येत होते अन्‌ ते धीरही देत होते. दोन दिवसात मी सहा गोळ्या घेतल्या. २४ जूनला छातीचा एक्‍सरे काढला. २५ जूनला इसीयू केलं. २६ जूनला रक्त तपासणी केली अन रिपोर्ट निगेटिव्ह आल्याचं अनुष्काने सांगितलं.

Edited By-  Kalyan Bhalerao

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com