दिव्यांगांचा आधारवड हरपला!

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 15 सप्टेंबर 2019

कुष्ठरोग्यांना स्वावलंबी आणि स्वाभिमानी जीवन जगता यावे, यासाठी अमरावती येथे त्यांच्या वडिलांनी 'तपोवन' संस्थेची स्थापना केली होती.

पुणे : दिव्यांगांच्या सर्वांगीण विकासासाठी कार्य करणाऱ्या ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या अनुताई भागवत (वय 92) यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या पश्‍चात मुलगी, सून आणि नातवंडे असा परिवार आहे. 'स्नेहप्रकाश' संस्थेच्या माध्यमातून त्यांनी दिव्यांगांच्या सबलीकरणासाठी मोलाचे कार्य केले. वडील शिवाजी पटवर्धन आणि आई पार्वतीबाई यांच्याकडून त्यांना समाजसेवेचा वारसा मिळाला. 

- बारामतीत भाजप- राष्ट्रवादीत श्रेय घेण्यासाठी चढाओढ

कुष्ठरोग्यांना स्वावलंबी आणि स्वाभिमानी जीवन जगता यावे, यासाठी अमरावती येथे त्यांच्या वडिलांनी 'तपोवन' संस्थेची स्थापना केली होती. लहानपणीच त्यांना महात्मा गांधी आणि कस्तुरबा गांधी यांचा सहवास लाभला. पतीच्या निधनानंतर अनुताईंनी कुष्ठरोग्यांच्या सेवेला स्वतःला समर्पित केले.

- मुख्यमंत्र्यांच्या 'महाजनादेश'मुळे रस्त्यावरील खड्डे गायब

'स्नेहप्रकाश' संस्थेच्या माध्यमातून त्या दिव्यांगांच्या आधारवड बनल्या. 1972 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या हस्ते त्यांना 'दलितमित्र' पुरस्काराने गौरविण्यात आले. आपल्या आई-वडिलांचा जीवनपट त्यांनी 'बिल्वदल' पुस्तकातून मांडला. 'इदं न मम' हे पुस्तक आणि 'सागर शक्ती आकाशी' हे नाटक विशेष गाजले.

- वारकऱ्यांचे श्रद्धास्थान भामचंद्र डोंगराची लचकेतोड!


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Anutai Bhagwat passes away